Rolls Royce ने केले अवैध व्यवहार; कंपनीविरुद्ध ED कडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सध्या भारतात फक्त तीन लोकांकडेच ही गाडी आहे. इतक्या मोठ्या कंपनीत आता अवैध व्यवहार झाला असल्याचे समोर येत आहे. त्याबद्दल ईडीने (ED) लंडनस्थित रोल्स रॉयस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात, मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी फौजदारी खटला दाखल केला आहे.
‘रोल्स रॉयस’ (Rolls Royce) ही जगातील सर्वात अलिशान आणि महागड्या गाड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. सध्या भारतात फक्त तीन लोकांकडेच ही गाडी आहे. इतक्या मोठ्या कंपनीत आता अवैध व्यवहार झाला असल्याचे समोर येत आहे. त्याबद्दल ईडीने (ED) लंडनस्थित रोल्स रॉयस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात, मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी फौजदारी खटला (Criminal Case) दाखल केला आहे. PSUs HAL, ONCG आणि GAIL यांच्याकडून कंत्राट प्राप्त करण्यासाठी एजंटला कमिशन म्हणून 77 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असल्याचा आरोप या कंपनीवर ठेवला गेला आहे. हा व्यवहार 2007 ते 2011 या काळात पार पडला असल्याचे समोर येत आहे.
यावर्षी जुलै महिन्यात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) यांच्याकडून एफआयआर दाखल झाल्यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रॅक्टक्शनच्या (Money Laundering Act) तरतुदीखाली हा खटला दाखल केला आहे. रोल्स रॉयस आणि त्याची भारतीय सहाय्यक कंपनी, सिंगापूरमधील अशोक पाटणी आणि त्यांची कंपनी आशमोर प्रायव्हेट लिमिटेड आणि मुंबईस्थित टर्बोटेक एनर्जी सर्व्हिसेस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), तेल आणि नैसर्गिक यांचे अज्ञात अधिकारी गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) आणि गेल यांच्यावर सीबीआयने गुन्हेगारी कट आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा: मुकेश अंबानी यांच्यानंतर 'ही' महागडी कार अजय देवगण याच्याकडे, किंमत पाहून थक्क व्हाल!)
2007 ते 2011 काळात एव्होन आणि अॅलिसन इंजिनच्या सुटे भागांच्या 100 पुरवठा करताना रोल्स रॉयस कंपनीने पाटणीला 'व्यावसायिक सल्लागार' म्हणून 18 कोटी रुपये दिले होते, असा आरोप केला गेला आहे. यासाठी केलेल्या पाच वर्षांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई झाली. संरक्षण मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी सुरू केली गेली होती, ज्यात रोल्स रॉयस आणि पाटणी यांच्या कंपनीच्या गुंतवणूकीबद्दलचे दास्ताऐवज प्राप्त झाले. तसेच सन 2003 ते 2013 या काळात रोल्स रॉयस आणि एचएएल यांच्यात एकूण 4,700 कोटींचा व्यवसाय झाला असल्याचेही तक्रारीमध्ये म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)