Nissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत
सिट्रॉन कंपनीने आपली पहिली प्रीमियम मिड-साइज एसयुवी Citroen C5 Aircross सह भारतात डेब्यू केला होता. त्यानंतर आता कंपनी आपली स्वस्त आणि स्थानिक रुपात निर्मिती केलेली सब-कॉम्पॅक्ट एसयुवी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Citroen Sub-Compact Suv: सिट्रॉन कंपनीने आपली पहिली प्रीमियम मिड-साइज एसयुवी Citroen C5 Aircross सह भारतात डेब्यू केला होता. त्यानंतर आता कंपनी आपली स्वस्त आणि स्थानिक रुपात निर्मिती केलेली सब-कॉम्पॅक्ट एसयुवी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, नवी एसयुवी मे मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ही कार भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसून आली आहे. मात्र याच्या डिझाइन संबंधित काही खास गोष्टी समोर आलेल्या नाहीत.(Tata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km)
याच्या डिझाइनसाठी कंपनीकडून एलईडी लाइटिंग, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, एक शानदार टचस्क्रिन इंन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटो एसी, रियर पार्किंग कॅमेरा आणि अलॉय व्हिल्सची सुविधा ग्राहकांना मिळू शकते. या व्यतरिक्त सुरक्षा फिचर्समध्ये ट्रॅक्शन कंट्रोल,स्टेबिलिटी कंट्रोलसह एअरबॅग्स दिले जाणार आहेत. सिस्ट्रॉनकडून काही दिवसांपूर्वी अशी पुष्टी करण्यात आली होती की, ते आपली अपकमिंग एसयुवी फक्त पेट्रोल इंजनसह उतरवणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनी यामध्ये 1.2 लीटर टर्बो-पेट्रोल इकाईचा प्रयोग करु शकते. त्याचसोबत ही सब-कॉम्पॅक्ट एसयुवी भारत आणि दक्षिण अमेरिकेत प्रथम लॉन्च केली जाऊ शकते. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे लॉन्चिंग पुढे ढकलली जाऊ शकते.(Mahindra XUV700 ठरणार कंपनीची नवी 7 सीटर SUV, प्रीमियम फिचरसह जाणून घ्या काय असणार खास)
तर काही दिवसांपूर्वीच भारतात Ford EcoSport SE लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने ही एसयुवीची किंमत 10.49 लाख रुपये ठेवली आहे. यामद्ये काही बदल सुद्धा करण्यात आले असून यंदा त्यात स्पेअर व्हिल्स दिले जाणार नाही आहे. तर हे स्पेअर व्हिल्स आता टेल गेट येथून हटवण्यात आले आहेत. Ford EcoSport SE पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पेट्रोल मॉडेल बद्दल बोलायचे झाल्यास याची किंमत 10.49 लाख रुपये तर डिझेल मॉडेलची किंमत 10.99 लाख रुपये आहे. ग्राहकांना आपल्या पसंदीनुसार मॉडेल निवडू शकतात
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)