कारचे इंजिन Overheat होत असल्यास त्यासाठी काय करावे, जाणून घ्या अधिक
मात्र जर कार जर तुम्हाला उत्तम सुविधा देतेय तर तुम्ही सुद्धा तिची काळजी घेतली पाहिजे. याच पार्श्वभुमीवर काही जण कार वरुनच साफ करतात.
कारमधून प्रवास करणे काही जणांना आरामदायी वाटते. मात्र जर कार जर तुम्हाला उत्तम सुविधा देतेय तर तुम्ही सुद्धा तिची काळजी घेतली पाहिजे. याच पार्श्वभुमीवर काही जण कार वरुनच साफ करतात. परंतु त्याचे इंजिनची जी घ्यावी लागते काळजी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच कारणामुळे तुमच्या कारचे इंजिन ओव्हरहिट होते. ऐवढेच नाही तर तुमच्या सोबत इंजिन ओव्हरहिटींगमुळे दुर्घटना सुद्धा होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला कारचे इंजिन ओव्हरहिट का होतेय हे जाणून घ्यायचे असल्यास येथे अधिक माहिती तुम्हाला देणार आहोत.
तुमच्या कारचे इंजिन थंड ठेवण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे काम कूलेंट करते. हे हिरव्या रंगाचे एक ऑइल असते. त्यामुळे जर तुमच्या कुलेंट मध्ये लिकेजची समस्या असल्यास किंवा ते खराब झाले असल्यास इंजिन थंड होऊ शकत नाही. याच कारणास्तव इंजिन अधिक गरम होते. या व्यतिरिक्त लक्षात ठेवा की, कूलेंट आमि पाण्याचा स्तर योग्य असावा. जर तुम्हाला हे समजत नसल्यास मॅन्युअल वाचून तुम्ही त्याचे फिलिंग करु शकता.(Elon Musk ला मोठा झटका; Tesla च्या गाड्यांमध्ये आढळल्या त्रुटी, 1,58,000 गाड्या परत मागवण्याचे आदेश)
जर तुमच्या कारच्या कुलेंटमध्ये लिकेजची समस्या नसल्यास, रेडिएटर मध्ये कुलेंट सुद्धा पर्याप्त असले तरीही इंजिन गरम होत असेल तर कुलेंटची नळी तपासून पहा. कारण असे सुद्धा होऊ शकते की, धूळीमुळे त्यामध्ये साचली जाऊ शकते.खरंतर कारचे इंजिन गरम होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र जर इंजिन गरजेपेक्षा अधिक गरम होत असल्यास कारचे रेटिएटर, वॉटर पंप, होज, हेड गॅसकेट किंवा थार्मोस्टेट हाउसिंगमध्ये काही लिक असू शकते. त्यामुळेच तुमच्या कारचे इंजिन नीट थंड होऊ शकत नाही. अशी समस्या येत असेल तर तुमच्या कारचे इंजिन मॅकानिककडून एकदा तपासून घ्या.