Royal Enfield Interceptor पेक्षा स्वस्त किंमतीत खरेदी करता येणार BMW G 310 R स्पोर्ट्स बाइक, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स

कारण भारतात बीएमडब्लूची सर्वात स्वस्त बाइक G 310R बद्दल उपलब्ध आहे.

बीएमडब्ल्यू लोगो (Photo Credit : Instagram)

जर तुम्ही बीएमडब्लू (BMW) कंपनीची स्पोर्ट्स बाइक खरेदी करायचा विचार करत असल्यास पण तुमचे बजेट थोडे कमी असेल तर चिंता करु नका. कारण भारतात बीएमडब्लूची सर्वात स्वस्त बाइक G 310R बद्दल उपलब्ध आहे. त्याबद्दलचीच माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. खास गोष्टी अशी की बाइक Royal Enfiled Interceptor पेक्षा ही स्वस्त आहे. ही एक एन्ट्री लेव्हल बाइक असून तुमच्या खिशाला सुद्धा परवडणारी आहे.(कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास 5 लाखांहून कमी किंमती मधील 'या' हॅचबॅक गाड्यांबद्दल जरुर जाणून घ्या)

बाइकच्या इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये 313cc लिक्विड कूल्ड इंजिन लावले आहे. हे इंजिन 9500rpm वर 34bhp ची कमीतकमी पॉवर आणि 7500rpm वर 28Nm चे पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या बाइकच्या इंजिनसह 6 स्पीड गिअरबॉक्स दिले आहे.फिचर्स संदर्भात अधिक माहिती द्यायची झाली तर बीएमडब्लू G310R मध्ये स्विचेबल डुअल चॅनल एबीएस, 300mm फ्रंट आणि 240mm डिस्क ब्रेक, एलईडी हेडलॅम्प, एलईडी DRL, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लाइट दिली गेली आहे. BMW G310R ही भारतात 2.45 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर Royal Enfiled Interceptor ची किंमत 2.65 लाख रुपये आहे.(MPV खरेदी करण्यापूर्वी जरुर तपासून पहा 'हे' फिचर्स, तुमच्या परिवाराच्या सेफ्टीसाठी ठरेल अत्यंत जरुरी)

याआधी गेल्या महिन्यात BMW Motorrad ने भारतात आपली बहुप्रतिक्षित R18 क्रुझर बाईल लॉन्च केली आहे. भारतात या बाईकची किंमत 18.90 लाख सुरुवातील किंमत लॉन्च केली आहे. मोटरसायकल दोन मॉडेल म्हणजेच R18 (स्टँडर्ड) बेस मॉडेल आणि दुसरा R18 (फर्स्ट अॅडीशन) ची सुरुवाती किंमत 21.90 लाख रुपये एक्स शो रुपये आहे. BMW R18 ची नुकतीच लॉन्च झालेली Harley-Davidson Fat Boy आणि Triumph Rocket 3GT क्रुझर बाइक्सला टक्कर देणारी ठरणार आहे