अखेर भारतात लाँच झाली BMW ची अ‍ॅडव्हेंचर बाईक; स्पीड आणि किंमत वाचून बसेल धक्का

ही गाडी पूर्णपणे बिल्ड-अप युनिट (CBU) वर उपलब्ध असेल. लाँचिंगसह बीएमडब्लू ने या बाईकची बुकिंगदेखील सुरू केली आहे.

BMW F 850 GS Adventure (Photo Credit : Youtube)

लोकप्रिय जर्मन वाहन निर्मिती कंपनी बीएमडब्ल्यू (BMW) ने भारतात, आपली हटके अ‍ॅडव्हेंचर बाईक लाँच केली आहे. या बाईकचे नाव बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस अ‍ॅडव्हेंचर (BMW F 850 GS Adventure) असे आहे. ही गाडी पूर्णपणे बिल्ड-अप युनिट (CBU) वर उपलब्ध असेल. लाँचिंगसह बीएमडब्लू ने या बाईकची बुकिंगदेखील सुरू केली आहे. या गाडीला पहिल्यांना मागील वर्षी इटलीच्या मिलान शहरात पार पडलेल्या 2018 ईआयसीएमए (EICMA) मोटर शो मध्ये सादर केले गेले होते.या बाईकची एक्स शोरुम किंमत 15.40 लाख रुपये आहे, मात्र या गाडीचे फीचर्स पाहता ही वैसा वसुल गाडी असल्याचे जाणवते.

या बाईकला समोर 21 इंच आणि रियर मध्ये 17 इंचाचे क्रॉस स्पोक व्हील दिले आहेत. तर हायमाउन्टेड एक्जॉस्ट आणि फ्रंट व्हील व स्पोकवर गोल्ड फिनिश दिलेला आहे. या गाडीचा इंधन टँक 23 लिटरचा आहे, जो F 850 GS पेक्षा 8 लिटर अधिक आहे. या बाईकमध्ये 6.5 इंचाच्या टीएफटी डिस्प्लेसह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी दिली आहे, म्हणजेच या गाडीला तुम्ही तुमचा फोन जोडू शकणार आहात. बाईकचा  टॉप स्पीड तब्बल 197 किलोमीटर प्रति तास इतका आहे. या गाडीचे वजन 244 किलो इतके आहे. (हेही वाचा: Bajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स)

बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस अ‍ॅडव्हेंचर मध्ये ऑटोमॅटिक स्टॅबिलीटी कंट्रोलसह डायनामिक, ट्रॅक्शन कंट्रोल आणि एबीएस प्रो सह डायनामिक आणि एंड्युरो नावाचे दोन ऑप्शनल राइडिंग मोड दिले आहेत. बाईकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्ससह 853 सीसीचा पॅरलल-ट्विन इंजिन दिलेला आहे, जो बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस मध्येही येतो. हे इंजिन 8,250 आरपीएम वर 95 एचपी पॉवर आणि 6,250 आरपीएमवर 98 एनएम टॉर्क जनरेट करते.