2021 Kia Seltos आणि Sonet Facelift SUV भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत

Kia India ने भारतात 2021 Seltos आणि 2021 Sonet SUV चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. या दोन्ही भारतात विक्री करण्यात येणाऱ्या कंपनीच्या बेस्ट सेलिंग मॉडेल्स आहेत. ज्यांची जबरदस्त डिमांड असून त्यामध्ये काही उत्तम फिचर्स सुद्धा दिले गेले आहेत.

Kia Sonet (Photo Credits-Twitter)

Kia India ने भारतात 2021 Seltos आणि 2021 Sonet SUV चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. या दोन्ही भारतात विक्री करण्यात येणाऱ्या कंपनीच्या बेस्ट सेलिंग मॉडेल्स आहेत. ज्यांची जबरदस्त डिमांड असून त्यामध्ये काही उत्तम फिचर्स सुद्धा दिले गेले आहेत. त्यानुसार कार ड्राइव्ह करताना आरामदायी अनुभव देते. कंपनीच्या दोन्ही नव्या मॉडेल्समध्ये कंपनीने काही नवे फिचर्स लॉन्च केले आहेत. त्याचसोबत या कारच्या टॉप मॉडेल्समध्ये देणारे एकूण फिचर्स लोअर वेरियंट्स मध्ये सहभागी केले आहेत.

कंपनीने या दोन्ही दमदार एसयुवीची बुकिंग घेणे सुद्धा सुरु केले आहे. 2021 Kia Seltos ची सुरुवाती किंमत 9,95,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 2021 Kia Sonet ची सुरुवाती किंमत 6,79,000 रुपये ठेवण्यात आली आहे. कियाने नवी सेल्टॉल्स आणि सोनेट एसयुवी मध्ये पॅडल शिफ्टर्स दिले आहे. सोनेट एसयुवी नंतर आता iMT तंत्रज्ञान Seltos मध्ये सुद्धा ऑफर केले जाणार आहे. तर iMT पेक्षा लैस सेल्टॉस 1.5 Petrol HTK+ वेरियंटमध्ये उपलब्ध आहे.(Tata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km)

कियाने नवी सेल्टॉसची एक आणखी प्रीमियम वेरिंयट उतरवली आहे. जी 1.4T-GDI Petrol GTX (O) मध्ये मिळणार आहे. नवी सॉनेट बद्दल बोलायचे असल्यास त्यामध्ये HTX ट्रिम ऑटोमॅटिक ऑप्शन मिळणार आहे. ज्यामध्ये HTX 7DCT (1.0T-GDI पेट्रोल) आणि HTX 6AT (1.5 डिझेल) समावेश आहे.(नव्या Beneli 320R मध्ये मिळणार अधिक स्पोर्टी लूकसह हे खास फिचर्स)

2021 Seltos मध्ये 17 नवे फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. जी सेगमेंट मधील पहिल्यांदा ऑफर केली जाणार असून त्यामध्ये स्मार्ट प्योर एअर प्युरीफायरचा समावेश आहे. जो व्हायरस आणि बॅक्टेरिया प्रोटेक्शनसह येणार आहे. किआने असा दावा केला आहे की, हे एयअर प्युरीफायर व्हायरस आणि बॅक्टेरिया पूर्णपणे खत्म करणार आहे. त्याचसोबत यामध्ये वायरलेस फोन प्रोजेक्शन ऑन कार टचस्क्रिन, ओवर द एअर मॅप अपडेट्स, अॅडिशनल वॉइस कमांड ऑन UVO कनेक्टेड कार सिस्टिमसुद्धा दिला जाणार आहे. ज्यामुळे सनरुफ आणि ड्रायव्हर विंडो कंट्रोल करता येऊ शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now