2021 Kawasaki Ninja 300 भारतात लॉन्च, किंमत 3.18 लाख रुपये

भारतात या बाइकची किंमत 3.18 लाख रुपये ठेवली गेली आहे. तर निंजा 300 जवळजवळ 20 हजार रुपयांनी महागली आहे. कावासकी डिलरशिप्सवर या मोटरसायकची बुकींग आधीपासूनच सुरु झाली आहे.

2021 Kawasaki Ninja 300 (Photo Credits-Twitter)

Kawasaki ने भारतात आपली आपडेटेड Ninja 300 स्पोर्ट्स बाइक लॉन्च केली आहे. भारतात या बाइकची किंमत 3.18 लाख रुपये ठेवली गेली आहे. तर निंजा 300 जवळजवळ 20 हजार रुपयांनी महागली आहे. कावासकी डिलरशिप्सवर या मोटरसायकची बुकींग आधीपासूनच सुरु झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या बाइकची डिलिव्हरी लवकरच सुरु केली जाणार आहे. इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास 2021 Ninja 300 मध्ये जुन्या मोटरसायकल मधील इंजिन दिले गेले आहे. जे आता BS6 एमिशन नॉर्म्स सारखे आहे. हे 296cc चे पॅरलल द्विन लिक्विड कूल्ड इंजिन असून जो 11,000 rmp वर 27Nm चे पीक टॉर्क जनरेट करणार आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे.

2021 कावासकी निंजा 300 मध्ये तीन पेंट ऑप्शन केआरटी लायवरी, लाइम ग्रीन/एबोनी डुअल टोन आणि एक फुल ब्लॅक पेंट स्किम दिली गेली आहे. कलर्स सोडून मोटरसायकची डिझाइन आणि लुकमध्ये कोणताच बदलाव करण्यात आलेला नाही. डिझाइन आणि फिचर्स जुन्या मोटरसायकल सारखेच आहेत. यामध्ये आधीसारखे द्विन पॉड्स हेडलॅम्प, फेअरिंग इंटिग्रेटेड फ्रंट ब्लिंकर्स, मस्क्युलर फ्युल टँक, स्प्लिट स्टाइल सीट्ससब क्रोम हीट शील्ड आणि एग्जॉस्टचा समावेश आहे.(मुंबई: पेट्रोल दरवाढीमुळे दुचाकीस्वार पेट्रोल इंजिनऐवजी बसवू लागलेत बॅटरी, महागाईपासून वाचण्यासाठी मुंबईकरांची नवी शक्कल)

जुन्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास जी नव्या कावासकी 2021 मध्ये दिले गेले आहेत. त्यात सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, कन्वेंशनल बल्ब टाइप हेडलॅम्प आणि ब्लिंकरसह एक एलईडी टेल लॅम्पचा समावेश आहे. त्याचसोबत मोटरसायकलमध्ये 17 इंचाचे अलॉय व्हिल्स, 37 मिमीचे टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि पाठी एक मोनोशक सस्पेंशन दिले गेले आहे. ब्रेकिंग बद्दल बोलायचे झाल्यास या मोटरसायकलमध्ये फ्रंट आणि रियर मध्ये डिस्क ब्रेक लावले गेले आहेत. ऐवढेच नव्हे तर एक्स्ट्रा सेफ्टीसाठी मोटरसायकलमध्ये डुअल चॅनल ABS चा सुद्धा समावेश आहे.