Yair Apologises to Hindus: दुर्गा देवीशी संबंधित आक्षेपार्ह ट्विटनंतर इस्त्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu च्या मुलाने मागितली भारतीयांची माफी; ट्वीट केले डिलीट

इस्त्रायली पंतप्रधानांच्या मुलाला त्याच्या 'अपमानास्पद' ट्विटमुळे ही दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. Yair ने केलेल्या ट्विटवर काही भारतीयांनी टीका केली होती.

Israel's Prime Minister Benjamin Netanyahu. (Photo Credits: Getty Images)

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांचा मोठा मुलगा Yair ने हिंदूंची माफी मागितली आहे. इस्त्रायली पंतप्रधानांच्या मुलाला त्याच्या 'अपमानास्पद' ट्विटमुळे ही दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. Yair ने केलेल्या ट्विटवर काही भारतीयांनी टीका केली होती. रविवारी Yair ने ट्विटरवर हिंदू देवी दुर्गाचा फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये दुर्गा देवीच्या चेहऱ्याच्या जागी लिएट बेन एरी (Liat Ben Ari) यांचा चेहरा लावण्यात आला होता. एरी हे नेतान्याहू यांच्यावरील चालू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फिर्यादी आहेत. या ट्वीट नंतर अनेक भारतीयांनी कमेंट्समध्ये याबाबत टीका केली होती.

29 वर्षीय Yair सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव आहे आणि बर्‍याचदा तो आपल्या वडिलांच्या धोरणांचा बचाव करताना दिसतो. आता ट्विटद्वारे दुर्गा देवीचा फोटो पोस्ट केल्यानंतर, लोकांनी आक्षेप घेतला व त्यानंतर नेतान्याहूच्या मुलाने हे ट्विट डिलीट करत हिंदू लोकांची माफी मागितली.

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या मुलाने ट्वीटमध्ये लिहिले, ‘मी एका सटायरिकल पेजवरून हे मीम ट्विट केले होते, जे इस्त्रायली राजकारणातील सेलिब्रिटींवर टीका करणारे होते. मला कल्पना नव्हती की या मीममधील फोटोशी हिंदूं धर्मियांच्या भावना व श्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. माझ्या भारतीय मित्रांच्या कमेंट्सनंतर मला याबद्दल माहिती झाली. त्यानंतर ताबडतोब मी हे ट्विट हटवले व याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.’ (हेही वाचा: मलेशियाचे माजी पंतप्रधान Najib Razak भ्रष्टाचाराच्या 7 खटल्यांमध्ये दोषी)

देवीच्या चेहऱ्यासह या मीममध्ये कॅप्शनखाली देवीसमवेत असलेल्या वाघाच्या तोंडाच्या जागी इस्त्रायली अटर्नी जनरल अविशाई मॅन्डेलबिटचा (Avichai Mandelbit) चेहरा लावण्यात आला होता. दरम्यान, इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर फसवणूक, विश्वासाचा भंग आणि लाच स्वीकारण्याच्या आरोपावरील खटला जेरूसलेमच्या एका न्यायालयात मे महिन्यात सुरु झाला आहे. हे आरोप निराधार असून ते षडयंत्र असल्याचे बेंजामिन यांनी म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif