World's Oldest Wine: जगातील सर्वात जुनी वाइन; तब्बल 1650 वर्षांनंतरही पिण्यासाठी असू शकते सुरक्षित (See Photos)
आता त्यांनी ती वापरून पहावी का, असा प्रश्न तज्ञांना पडला आहे.
जुन्या गोष्टींचे महत्त्व काहीसे वेगळे असते. आजही तुमच्याकडे एखादी जुनी महत्वाची वस्तू असेल तर त्याची किंमत नक्कीच तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त असू शकते. आता जुन्या वस्तूंच्या यादीत एक नवीन नाव जोडले गेले आहे, ती म्हणजे वाइन. जगातील सर्वात जुन्या वाइनचे (World's Oldest Wine) वय 1,650 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तसेही ही वाइन इतक्या वर्षानंतरही सेवन करण्यासाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
साधारण 1,650 वर्षांपूर्वी बनवलेली जगातील सर्वात जुनी वाइन अजूनही पिण्यासाठी सुरक्षित असू शकते. ज्या बाटलीमध्ये ही वाइन ठेवली आहे, ती बाटली अतिशय खराब अवस्थेमध्ये आहे मात्र तिच्यामध्ये असलेली वाइन तुम्ही पिऊ शकता. अहवालानुसार ही वाइन 325 ते 359 CE च्या दरम्यान कुठेतरी तयार केली गेली होती असे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, या बाटलीभोवती घाण आणि काजळी दिसून येते मात्र त्यातील वाइनची अद्याप पिण्यायोग्य चव असू शकते.
अहवालात असे निदर्शनास आणले आहे की, ही वाइनची बाटली 1867 मध्ये जर्मन शहर स्पेयरमध्ये रोमन थडग्याच्या उत्खननादरम्यान सापडली होती. ही वाइनची बाटली 16 बाटलींपैकी एक होती, परंतु आता फक्त एकच उरली आहे. ही वाइन बनवण्यासाठी बाहेरून हवा बंद करून ऑलिव्ह ऑईलचा वापर करून वाइन बनवली होती. बाटलीमध्ये जे उरले आहे ते एक स्पष्ट, अल्कोहोल नसलेले द्रव आणि एक घन राळ सारखा पदार्थ आहे. (हेही वाचा: World War II Ship Found: तब्बल 80 वर्षांनी सापडले दुसऱ्या महायुद्धातील जहाज; घ्या जाणून)
स्पेयर येथील ऐतिहासिक संग्रहालयात ही बाटली शंभर वर्षांहून अधिक काळ प्रदर्शनात आहे. आता त्यांनी ती वापरून पहावी का, असा प्रश्न तज्ञांना पडला आहे. वाइन प्रोफेसर मोनिका क्रिस्टमन म्हणाल्या, ‘सूक्ष्म-जैविकदृष्ट्या ते कदाचित खराब झाले नाही, परंतु त्यामुळे मद्यपानाची मजा येणार नाही.’ क्रिस्टमनच्या मते, या वाइनची चव भयानक असेल आणि ही बाटली उघडणे धोकादायक असू शकते.