Bob Weighton, जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं वयाच्या 112 व्या वर्षी निधन

इंग्लंडमधील Hampshire भागातील Alton या गावात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Bob Weighton World's oldest man dies aged 112 | Photo Credits: GuinnessWorldRecords

जगातील सर्वात वयोवृद्ध (World's Oldest Man)  व्यक्ती  Bob Weighton यांचं वयाचं 112 व्या वर्षी निधन झालं. इंग्लंडमधील Hampshire भागातील Alton या गावात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारी 2020 मध्ये जपानच्या 112 वर्षीय Chitetsu Watanabe या व्यक्तीच्या निधनानंतर जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मान Bob Weighton यांना मिळाला होता.

Bob Weighton यांच्या कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये त्यांचा उल्लेख "extraordinary man" असा करण्यात आला आहे. दरम्यान 28 मे 2020, गुरूवारी झोपेमध्येच कॅन्सर पिडीत बॉब यांची प्राणज्योत मालवली. अशी माहिती देण्यात आली आहे. बॉब यांचा जन्म 29 मार्च 1908 साली East Yorkshire मध्ये झाला होता. त्यांनी कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये घरच्या घरीच त्यांचा अखेरचा वाढदिवस साध्या पद्धतीने काही महिन्यांपूर्वी साजरा केला होता.

Guinness World Records कडून श्रद्धांजली 

"बॉब आमच्यासाठी आदर्श आहेत. ते जगभरातील विविध लोकांसोबत संपर्कात आले. त्यांच्यासोबत ते जगले. ते सार्‍यांना त्यांच्या बहिण-भावाच्या जागी पाहत होते. त्यांना प्रत्येकाची काळजी होती. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी अनेकांशी मैत्री टिकवली. राजकारण, इकॉलॉजी, थिऑलॉजी अशा विषयांवर त्यांचे वाचन आणि गप्पा सुरू होत्या. " अशी माहिती बॉब यांच्या कुटुंबाने दिली आहे.

पेशाने इंजिनियर असणार्‍या बॉब यांनी तैवान, जपान, कॅनडा मध्ये काम केले आहे. बॉब यांच्या पश्चात त्यांची 2 मुलं, 10 नातवंड आणि 25 पतवंड असा परिवार आहे.