World’s Best Restaurant: लवकरच बंद होणार जगातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट Noma, जाणून घ्या कारण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोमा रेस्टॉरंट दोन दशकांपासून नॉर्डिक फूड बनवत आहे. हे प्रसिद्ध रेस्टॉरंट त्यांच्या स्वयंपाकघरातील नवनवीन शोध, नवीन फ्लेवर्स आणि ते देत असलेल्या खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. इंडिपेंडंटमधील एका वृत्तात म्हटले आहे की, हे जगप्रसिद्ध रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय शेफ रेडझेपी यांनी घेतला होता.

Noma Restaurant (संग्रहित संपादित प्रतिमा)

डेन्मार्कमधील एक जगप्रसिद्ध नोमा रेस्टॉरंट (Noma Restaurant) पुढील वर्षी 2024 मध्ये बंद होणार आहे. नोमाची स्थापना 2003 मध्ये झाली होती, त्यानंतर अनेक वेळा याला जगातील टॉप रेस्टॉरंटचा (World’s Best Restaurant) किताब मिळाला आहे. नोमा रेस्टॉरंट हे फक्त सिझननुसारच उघडते आणि बंद होते. इथे जेवायला जागा मिळणे खूप अवघड आहे. आता काही दिवसांसाठी नोमा रेस्टॉरंट बंद होत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोमा कायमचा बंद होत नाहीये, तर त्याऐवजी, तो डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये त्याच्या नवीन स्वरूपात पुन्हा उघडेल. नोमा रेस्टॉरंटचे सह-मालक आणि प्रसिद्ध शेफ रेने रेडझेपी (René Redzepi) यांनी सोशल मीडियावर घोषणा केली आहे की, ‘नोमा आहे तसे राहण्यासाठी, आपण बदलले पाहिजे. म्हणून, प्रिय अतिथी आणि मित्रांनो, 2024 चा हिवाळा हा नोमाचा शेवटचा हंगाम असेल. आम्ही एक नवीन अध्याय सुरू करत आहोत- noma 3.0. आम्हाला आशा आहे की या नवीन प्रवासात तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हाल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by noma (@nomacph)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोमा रेस्टॉरंट दोन दशकांपासून नॉर्डिक फूड बनवत आहे. हे प्रसिद्ध रेस्टॉरंट त्यांच्या स्वयंपाकघरातील नवनवीन शोध, नवीन फ्लेवर्स आणि ते देत असलेल्या खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. इंडिपेंडंटमधील एका वृत्तात म्हटले आहे की, हे जगप्रसिद्ध रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय शेफ रेडझेपी यांनी घेतला होता. उत्तम जेवणाचा उद्योग दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तो बदलणे आवश्यक असल्याने त्यांनी तो सध्या हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: सौदी अरेबियाने हटवले हज यात्रेवरील निर्बंध; आता यात्रेकरूंच्या संख्येवर व वयावर मर्यादा नसेल)

ते म्हणतात, ‘आम्हाला उद्योगाचा पूर्णपणे पुनर्विचार करावा लागेल. हे खूप कठीण आहे आणि आम्हाला वेगळ्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील. यापूर्वी 2016 मध्ये नोमा रेस्टॉरंट री-ब्रँडिंगसाठी बंद करण्यात आले होते, जे दोन वर्षांनी 2018 मध्ये पुन्हा सुरू झाले. री-ब्रँडिंगनंतर नोमा नव्या अवतारात आले. आता 6 वर्षांनंतर हे रेस्टॉरंट पुन्हा एकदा नव्या अवतारात येण्याच्या तयारीत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement