World Billionaires List: जगातील 500 श्रीमंतांनी 2023 मध्ये कमावले $852 अब्ज; Elon Musk अव्वल, तर Gautam Adani यांचे सर्वाधिक नुकसान
टेस्लाचे शेअर्स सोमवारी न्यूयॉर्कमध्ये 6.9 टक्क्यांनी वाढले आणि त्यांच्या संपत्तीमध्ये $13 अब्ज अतिरिक्त वाढ झाली. त्याच वेळी, 2022 मध्ये, टेस्लाच्या सीईओच्या संपत्तीमध्ये विक्रमी घट नोंदवली गेली.
जगातील 500 श्रीमंतांनी (World's Richest People) यावर्षी तब्बल 852 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक कमाई एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे. दुसरीकडे याचा सर्वाधिक फटका गौतम अदानींना बसला आहे. ब्लूमबर्ग डेटानुसार, जगातील 500 श्रीमंत व्यक्तींपैकी प्रत्येकाने गेल्या सहा महिन्यांत दररोज सरासरी $14 दशलक्ष कमावले आहेत. 2020 च्या शेवटच्या सहामाहीपासून अब्जाधीशांसाठी हे सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. तेही अशा वेळी जेव्हा अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत.
बँकांच्या मंदीचा आणि व्याजदराचा अब्जाधीशांच्या कमाईवर परिणाम झालेला नाही, कारण शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे त्यांची नेटवर्थ वाढली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या प्रत्येक सदस्याने गेल्या सहा महिन्यांत दररोज सरासरी $14 दशलक्ष कमावले आहेत.
एलॉन मस्क यांनी 30 जूनपर्यंत त्यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये $96.6 अब्जची भर घातली, तर मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचे सीईओ झुकेरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये $58.9 अब्जची वाढ झाली आहे. गौतम अदानी यांच्या एकूण मालमत्तेत सहा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक 60.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 27 जानेवारी रोजीच सुमारे $20.8 बिलियनच्या तोट्यासह सर्वात मोठे नुकसान नोंदवले. त्यावेळी हिंडेनबर्गने अडाणी यांच्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला होता. (हेही वाचा: Toshakhana Case: तोशाखाना प्रकरणात इस्लामाबाद कोर्टाचा इमरान खान यांना दिलासा, जामीन मंजूर)
जुलैमध्ये एलोन मस्कच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ नोंदवली. टेस्लाचे शेअर्स सोमवारी न्यूयॉर्कमध्ये 6.9 टक्क्यांनी वाढले आणि त्यांच्या संपत्तीमध्ये $13 अब्ज अतिरिक्त वाढ झाली. त्याच वेळी, 2022 मध्ये, टेस्लाच्या सीईओच्या संपत्तीमध्ये विक्रमी घट नोंदवली गेली.