Iran Woman Strips Protest: इराणमधील विद्यापीठात विद्यार्थिनीने काढले कपडे; काय आहे संपूर्ण प्रकरण?

तरुणीने हे पाऊल उचलल्यानंतर काही तासात तिला अटक करण्यात आली आहे.

Photo Credit- X

 Iran Woman Strips Protest: इराणची राजधानी तेहरानमधील एका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अंतरवस्त्रामध्ये फिरताना (Iran Woman Strips Protest) दिसली. तरुणीने हे पाऊल उचलल्यानंतर काही तासात तिला अटक करण्यात आली आहे. तेहरानच्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड रिसर्चमध्ये शनिवारी ही घटना घडली. देशातील महिलांसाठी असलेल्या कठोर इस्लामिक ड्रेस कोडच्या विरोधात तरुणीने हे पाऊल उतललं असल्याचे म्हटले आहे. तसचं या घटनेवर अनेक प्रतिक्रीया ही येत आहे.

अमीर कबीर न्यूजलेटरच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी मुलीचा छळ केला आणि तिचे कपडे ओढले. आयएसएनए सह इराणी प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बनवल्यानंतर या तरुणीला त्यांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं आणि त्याचा विरोध करताना तिने स्वत:चे कपडे काढले. तसेच, युनिव्हर्सिटीचा दावा आहे की ड्रेस कोडवर झालेल्या संभाषणानंतर विद्यार्थिनीने तिचे कपडे काढले. मुलगी मानसिकदृष्ट्या असंतुलीत आहे. या प्रकरणात असून ठोक रित्या काही स्पष्ट झाले नाही.

इराणमध्ये महिलांना हिजाबशिवाय घराबाहेर पडता येत नाही

संयुक्त राष्ट्राच्या राजदूत माई सातो यांनी सांगितले की त्या या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. इराणमधील कठोर इस्लामिक कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणे बंधनकारक आहे. हे कायदे पोलिस लागू करतात आणि त्यांचे उल्लंघन केल्याबद्दल महिलांना शिक्षा देखील होऊ शकते.

इराणमधील महिलांसाठी असलेला ड्रेस कोड आणि त्याची अंमलबजावणी अनेकवेळा वादग्रस्त ठरली आहे. 2022 मध्ये, 22 वर्षीय महिला महसा अमिनीच्या मृत्यूनंतर संपूर्ण इराणमध्ये ड्रेस कोडच्या विरोधात निदर्शने सुरू झाली होती. हिजाब न घातल्यामुळे अमिनीला अटक करण्यात आली आणि कोठडीतच तिचा मृत्यू झाला. यामुळे इराणी महिला संतप्त झाल्या होत्या. अमिनीच्या मृत्यूनंतर महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. तेहरान विद्यापीठात आता ही घटना घडल्यामुळे अनेकांनी प्रकरण वाढणार असल्याच्या शंका व्यक्त केल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif