Google मध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात? सीईओ Sundar Pichai यांनी दिले 12,000 नोकऱ्या जाण्याचे संकेत

गुगलच्या कर्मचार्‍यांना यावर्षी ऑपरेटिंग खर्चात 20 टक्के कपात करण्यास सांगितले आहे.

CEO of Google Sundar Pichai (Photo Credits: ANI)

गुगलमध्ये (Google) पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची (Layoffs) शक्यता आहे. याआधी जानेवारीमध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या 6 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. आता कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी पुन्हा कंपनीत नोकर कपात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) शी बोलताना त्यांनी हे संकेत दिले. मात्र, त्यांनी याबाबत अधिक खुलासा केला नाही. यावेळी त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापराबद्दल भाष्य केले.

पिचाई यांनी गुगलच्या एआय चॅटबॉट बार्डचा उल्लेख केला. या संधीबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत, असे ते म्हणाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कंपनीच्या सध्याच्या प्रकल्पांबद्दल त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही आमच्या प्राधान्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला आमच्या सर्वात महत्त्वाच्या क्षेत्राकडे लोकांना वळवायचे आहे.

दुसरीकडे, कंपनी आपला खर्च कमी करून आपला व्यवसाय अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करत आहे. गुगलच्या कर्मचार्‍यांना यावर्षी ऑपरेटिंग खर्चात 20 टक्के कपात करण्यास सांगितले आहे. पिचाई म्हणतात की, ते कंपनी सुधारण्यासाठी काम करत आहेत. कंपनी करत असलेल्या कामाच्या प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय कंपनी खर्च कमी करण्यासाठीही प्रयत्न करत आहे. पिचाई यांच्या म्हणण्यानुसार, अनेक बाबींमध्ये प्रगती होत आहे, परंतु अजूनही बरेच काम पूर्ण व्हायचे आहे. (हेही वाचा: TCS Placements: TCS ची मोठी घोषणा, 40 हजार फ्रेशर्सना कंपनी देणार नोकरी)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या क्रेझबद्दल ते म्हणाले की, कंपनी या क्षेत्रातही पुढे जात आहे. हे असे क्षेत्र आहे जिथे विशेष काम करावे लागेल. कंपनी फक्त सर्वात महत्वाच्या क्षेत्रातच कर्मचाऱ्यांना काम करायला लावणार आहे. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये, गुगलने आपल्या भारतातील कार्यालयांमधून सुमारे 450 कर्मचाऱ्यांना काढून टाकले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif