गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी कॅनडा बनणार अमेरिकेचे 51वे राज्य? Donald Trump यांच्या दाव्याने खळबळ, जाणून घ्या PM Mark Carney यांची प्रतिक्रिया
ट्रम्प यांनी 28 मे रोजी ट्रुथ सोशलवर लिहिले की, कॅनडाला त्यांच्या ‘गोल्डन डोम’ यंत्रणेचा भाग व्हायचे आहे, आणि ते या ऑफरचा विचार करत आहेत. गोल्डन डोम ही एक महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आहे, ज्याची किंमत 175 अब्ज डॉलर्स असून, ती 2029 पर्यंत पूर्ण होईल असे ट्रम्प यांनी जाहीर केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी एक खळबळजनक दावा केला की, कॅनडा (Canada) त्यांच्या प्रस्तावित ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेत मोफत सहभागी होण्यासाठी, अमेरिकेचे 51वे राज्य बनण्याचा विचार करत आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मंचावर ही माहिती शेअर केली. त्यांनी म्हटले की, कॅनडाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहिल्यास या यंत्रणेत सहभागासाठी 61 अब्ज डॉलर्स द्यावे लागतील, परंतु 51वे राज्य बनल्यास हा खर्च शून्य असेल. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मात्र हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला असून, कॅनडाची सार्वभौमता अबाधित राहील असे ठामपणे सांगितले.
ट्रम्प यांनी 28 मे रोजी ट्रुथ सोशलवर लिहिले की, कॅनडाला त्यांच्या ‘गोल्डन डोम’ यंत्रणेचा भाग व्हायचे आहे, आणि ते या ऑफरचा विचार करत आहेत. गोल्डन डोम ही एक महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आहे, ज्याची किंमत 175 अब्ज डॉलर्स असून, ती 2029 पर्यंत पूर्ण होईल असे ट्रम्प यांनी जाहीर केले. ही यंत्रणा उपग्रह-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून बॅलिस्टिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा सामना करेल, आणि प्रथमच अमेरिकेद्वारे अवकाशात शस्त्रास्त्रे तैनात केली जातील. ट्रम्प यांनी दावा केला की, ही यंत्रणा ‘अवकाशातून प्रक्षेपित क्षेपणास्त्रांनाही रोखू शकते.’
कॅनडासाठी ही यंत्रणा महत्त्वाची आहे, कारण त्यांचे विशाल हवाई क्षेत्र रशिया आणि चीनकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेला रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी 20 मे रोजी कॅनडाने या यंत्रणेत रस दाखवल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी कॅनडाला दोन पर्याय दिले: स्वतंत्र राहून 61 अब्ज डॉलर्स देणे किंवा 51वे अमेरिकी राज्य बनून मोफत प्रवेश मिळवणे. ट्रम्प यांनी ‘कॅनडा ही ऑफर विचारात घेत आहे’, असे म्हटले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली.
परंतु कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांच्या दाव्याला स्पष्टपणे नाकारले आहे. 28 मे रोजी कार्नी यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले, ज्यात म्हटले की, कॅनडा आपली सार्वभौमता कधीही सोडणार नाही. आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत आणि राहू. कार्नी यांनी यापूर्वी 6 मे रोजी वॉशिंग्टन डीसी येथे ट्रम्प यांच्याशी भेटीतही कॅनडाची स्वायत्तता राखण्याचा पुनरुच्चार केला होता. कॅनडाच्या संसदेत किंग चार्ल्स तिसरे यांनीही 27 मे रोजी केलेल्या भाषणात देशाच्या स्वातंत्र्यावर जोर दिला, जे ट्रम्प यांच्या दाव्याला अप्रत्यक्ष उत्तर मानले जाते. (हेही वाचा; Donald Trump Threatens 25% Tariff on Apple: 'भारतात नाही तर अमेरिकेत आयफोन बनवा'; डोनाल्ड ट्रम्प यांची अॅपलवर 25% कर लादण्याची धमकी)
कॅनडाने गोल्डन डोम यंत्रणेत सहभागाबाबत ‘सक्रिय चर्चा’ सुरू असल्याचे मान्य केले आहे, परंतु त्यांनी सहभागाचा स्वरूप आणि खर्च याबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. कॅनडाच्या ऐतिहासिक भूमिकेनुसार, त्यांनी उत्तर अमेरिकेच्या हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, परंतु सार्वभौमत्वावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे कार्नी यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांचा कॅनडाला 51वे राज्य बनण्याचा प्रस्ताव हा त्यांच्या आधीच्या धोरणांचा भाग आहे, ज्यामध्ये त्यांनी कॅनडावर तीव्र आयात शुल्क लादण्याची धमकी दिली होती.
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2025 11:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

