महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय? अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पद का आहे धोक्यात

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ह मध्ये महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोरील समस्या अधिक वाढल्या आहेत. तर जाणून घ्या महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय आहे

US President Donald Trump (Photo: White House)

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विरोधात हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ह मध्ये महाभियोगाचा (Impeachment) प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोरील समस्या अधिक वाढल्या आहेत. तर जाणून घ्या महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे पद का धोक्यात आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन विवादानंतर हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हची स्पीकर नैन्सी पॉलोसीने ट्रम्प यांनी पदाचा दुरोपयोग करत आरोप लावत असे महाभियोगाचा प्रस्तावाबाबत सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी 6 तास यावर चर्चा पार पडली. दोन आर्टिकलच्या अंतर्गत महाभियोगाचा प्रस्ताव हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ह मध्ये पास करण्यात आला. त्यानंतर असे स्पष्ट झाले की, ट्रम्प यांच्या विरोधात सीनेटच्या सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे. याचा थेट परिणाम ट्रम्प यांच्या पदावर होणार आहे.

>>कशी असणार महाभियोग प्रस्तावाची प्रक्रिया?

- महाभियोग ही प्रक्रिया फार कठीण असल्याचे म्हटले जाते. अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी एक मोठी संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

-अमेरिकेच्या संविधानानुसार, कोणत्याही राष्ट्रपती यांचा 4 वर्षाच्या अगोदर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी महाभियोगाच्या माध्यमातून त्यांना हटवण्यात येते.

-राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या पदावरुन हटवण्यासाठी त्याचे काही गोष्टी आहेत. त्यामध्ये राष्ट्राध्यक्षांकडून देशद्रोह, लाच घेणे किंवा उच्च अपराध यासारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आल्यास त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या पदावरुन हटवण्यात येते.

-भ्रष्ट्राचार, दुर्व्यवहार आणि न्यायालयाच्या कार्यवाहित बाधा टाकणे सुद्धा अपराध मानला जातो.

-राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या पदावरुन हटवण्यासाठी हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव यांच्या एक ज्युरी सारखेच दोन तृतीयांश बहुमताने महाभियोग प्रस्ताव मंजूर करु शकते.

-सीनेट यांच्याकडे महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर एका न्यायालयाप्रमाणे राष्ट्राध्यक्षांना पदावरुन हटवण्यात येते.(Donald Trump Impeachment: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर)

हाउस ऑफ ज्युडिशियरी कमेटी यांनी गेल्या आठवड्यात ट्रम्प यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या दोन आरोपांना मंजूरी दिली आहे. यामध्ये पहिला आरोप म्हणजे, त्यांनी युक्रेनवर 2020 च्या निवडणूकीसाठी ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहणारे जो बिडेन यांना बदनान करण्यासाठी दबाब आणला होता. दुसरा आरोपात असे म्हटले आहे की, ते कॉंग्रेसला अडथळा आणत आहेत. त्याचसोबत ट्रम्प यांनी महाभियोग तपासणीस पाठिंबा दर्शविला नाही. अमेरिकेच्या ज्युडिशिरी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव यांनी संयुक्त राज्य अमेरिकेचे 45 वे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाच्या प्रस्तावासाठी मतदान केले आहे. तर बुधवारी हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव मध्ये जवळजवळ या प्रस्तावर 10 तास वाद झाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Who Is Priya Saroj? प्रिया सरोज कोण आहे? वय, संपत्ती आणि राजकीय पार्श्वभूमी, समाजवादी पक्षाच्या खासदाराबद्दल सर्व काही घ्या जाणून, रिंकू सिंहसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त

Barack and Michelle Obama Divorce: बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचा घटस्फोट होणार? माजी फर्स्ट लेडी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याने चर्चेला उधाण

South Indian Foods: दक्षिण भारतीयांचा आवडता चविष्ट पदार्थ सांबर ही खरं तर मराठ्यांची देणगी, जाणुन घ्या, काय आहे त्या मागची खरी कथा

No Internet on 16 Jan 2025: 16 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण जगात इंटरनेट बंद होणार का? 'द सिम्पसन'चा अंदाज, एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Share Now