West Virginia Child Death: रडलं म्हणून बापाने थेट बाळच भिरकावलं, कवटीस दुखापत झाल्याने मृत्यू; नैराश्येतून कृत्य केल्याची कबुली, पोलीस तपास सुरु

एका थरारक कृत्यामुळे वेस्ट व्हर्जिनिया येथीलजेन ल्यू शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका 27 वर्षीय विवाहीत पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यास अटकही (Zachary Williams Arrested) करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने केवळ 17 महिन्यांचे बाळ केवळ रडतं आहे म्हणून भिरकावून दिले.

West Virginia Child Death: रडलं म्हणून बापाने थेट बाळच भिरकावलं, कवटीस दुखापत झाल्याने मृत्यू; नैराश्येतून कृत्य केल्याची कबुली, पोलीस तपास सुरु
Child | Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

Abuse Case West Virginia: एका थरारक कृत्यामुळे वेस्ट व्हर्जिनिया येथीलजेन ल्यू शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका 27 वर्षीय विवाहीत पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यास अटकही (Zachary Williams Arrested) करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने केवळ 17 महिन्यांचे बाळ केवळ रडतं आहे म्हणून भिरकावून दिले. ज्यात बाळाच्या कवटीला गंभीर दुखापत (Baby Skull Fracture) झाल्याने त्याचा मृत्यू (West Virginia Child Death) झाला. ही घटना 25 मे रोजी चार्ल्सटनच्या ईशान्येकडील सुमारे 100 मैलांवर असलेल्या जेन ल्यू येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाचेरी विल्यम्स (Zachary Williams) असे या पुरुषाचे नाव आहे. तो नैराश्येने ग्रासलेला असतो. त्याने रडणाऱ्या बाळाला संतापाच्या भरात त्याने जोरात फेकले. त्यामुळे बाळाच्या डोक्याला मोठा मार लागला. बाळ थोड्याच वेळात बेशुद्ध झाले आणि त्याने श्वास घेणे थांबले.

वैद्यकीय उपचार मिळूनही बाळाचा मृत्यू

झाचेरी विल्यम्स या माथेफिरू मनुष्याने बाळाला फेकल्याची घटना समजताच तातडीने मदत आणि बचाव कार्य राबविण्यात आले. पुढच्या काहीच मिनिटांमध्ये रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून McWhorter Road येथून सकाळी 9 वाजता बाळाला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णवाहिकेत सीपीआर दिले गेले, परंतु तासाभरानंतर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

बाळ आगोदरच आजारी पण स्थिर होते- आई

बाळाच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बाळाची प्रकृती आगोदरच बिघडली होती. त्यास सर्दी झाल्याने श्वास घेण्यास अडथळा येत होता. त्यामुळे ते चिडचिडे झाले होते आणि रडतही होते. असे असले तरी त्याची प्रकृती स्थिर होती. श्वास चोंदत असल्याने त्याला झोप येत नव्हती आणि ते रडत होते. त्याच्या रडण्यामुळे झाचेरी विल्यम्स हा तिचा नवरा त्रासला होता. तरीही तो सकाळी शांत होता. त्याने बाळाला शांतर करण्याचा प्रयत्न केला. पण काहीच वेळात ते बेशुद्ध झाले. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यास वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, वैद्यकीय तपासात त्याच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याचे आढळून आले. संशयामुळे पोलीस तक्रार करण्यात आली.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी संशय आल्याने झाचेरी विल्यम्स याच्याकडे चौकशी केली असता, आपणच बाळाला फेकल्याचे त्याने कबुल केले. आपण बाळाला फेकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याने पोलिसांना असेही सांगितले की, बाळासोबत आपण केलेले कृत्य गंभीर चूक आहे. पण आपण नैराश्येत हे कृत्य केल्याचे तो म्हणाला.

आरोपीस अंमली पदार्थांच्या सेवनाची सवय

पीडित बाळाच्या आजी आजोबांनी म्हणजेच आरोपीच्या आईवडीलांनी सांगिले की, त्यांचा मुलगा कधी कधी नशा करतो. अनेकदा तो गांजा किंवा तत्सम अंमली पदार्थांचे सेवन करतो. खास करुन घरी कोणी नसताना तो कधी कधी Delta-8 नावाचे गांजासदृश औषध ओढते. दरम्यान, Zachary Williams सध्या Central Regional Jail मध्ये कोणतीही जामीन न मिळता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).