Virgin Girls Pleasure Squad: हुकूमशहा Kim Jong-Un दरवर्षी 25 'व्हर्जिन मुलींशी' ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड, जाणून घ्या सविस्तर
या पथकासाठी मुलींची निवड झाली की, हुकूमशहा आणि त्याच्या अधिकाऱ्यांना खूश करणे हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. पोर्टनुसार, दिवंगत कोरियाचा माजी हुकूमशहा किम जोंग इल याचा असा विश्वास होता की, कुमारी मुलींसोबत संबंध ठेवल्यास व्यक्ती अधिक आयुष्य जगते.
Virgin Girls Pleasure Squad: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-Un) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एका कोरियन युट्युबरने त्याच्याविरोधात मोठा खुलासा केला आहे. या युट्युबरनुसार, किम जोंग दरवर्षी 25 कुमारी म्हणजेच व्हर्जिन मुली निवडतो आणि आपल्या बंगल्यात या मुलींशी शारीरिक संबंध ठेवतो. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग स्वतःच्या मनोरंजनासाठी प्लेजर स्क्वॉड (Pleasure Squad) नावाचा ग्रुप चालवतो. किम जोंग उन आणि त्याच्या साथीदारांचे मनोरंजन करणे हे या गटाचे काम आहे. नुकतेच उत्तर कोरियातून पळून आलेल्या येओनमी पार्क या महिलेने ब्रिटीश मीडिया डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत या पथकाचा खुलासा केला आहे.
द डेली स्टारच्या रिपोर्टमध्ये, 30 वर्षीय कोरियन यूट्यूबर आणि लेखक येओनमीच्या मते या मुलींची निवड करताना सौंदर्यासोबतच राजकीय समजही विचारात घेतली जाते. येओनमी 2007 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी उत्तर कोरियातून पळून गेली होती. यानंतर ती दक्षिण कोरिया आणि नंतर अमेरिकेत गेली. पार्कने सांगितले की, तिची या प्लेजर स्क्वॉडसाठी दोनदा निवड झाली होती, परंतु कौटुंबिक स्थितीमुळे ती या गटात सामील होऊ शकली नाही. (हेही वाचा: Child Sexual Abuse on Caldey Island: ख्रिश्चनांच्या 'पवित्र बेटा'वर कॅथोलिक भिक्षूंकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण; 50 हून अधिक जणांनी केले आरोप, चौकशी सुरु)
किमच्या या प्लेजर स्क्वॉडमध्ये मुलींची निवड करण्यासाठी, सरकारी अधिकारी देशभरातील शाळांना भेट देतात. मुलींचा शोध घेतल्यानंतर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली जाते. ज्या मुलींच्या कुटुंबातील सदस्य उत्तर कोरियातून पळून गेले आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक दक्षिण कोरियात आहेत अशा मुलींचा या पथकात समावेश होत नाही. पहिल्या टप्प्यात मुलींची निवड केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. मुलींच्या शरीरावर डाग किंवा तीळ यांसारख्या गोष्टी असल्यास त्या मुली नाकारल्या जातात. तपासानंतर ज्या काही निवडक मुली उरतील, त्यांना राजधानी प्योंगयांगला पाठवले जाते. किम जोंग उनची पत्नी देखील या प्लेजर स्क्वॉडचा एक भाग होती असे सांगितले जाते.
या पथकासाठी मुलींची निवड झाली की, हुकूमशहा आणि त्याच्या अधिकाऱ्यांना खूश करणे हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. पोर्टनुसार, दिवंगत कोरियाचा माजी हुकूमशहा किम जोंग इल याचा असा विश्वास होता की, कुमारी मुलींसोबत संबंध ठेवल्यास व्यक्ती अधिक आयुष्य जगते. किम जोंग इलचे 2011 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हे पथक तयार करण्याची कल्पनाही किम जोंग इलचीच होती. त्याने 1970 मध्ये या पथकाची सुरुवात केली. हुकूमशहाच्या भीतीमुळे या मुलींचे कुटुंबीयही त्यांना या कामासाठी पाठवतात. यानंतर या मुली वयाच्या 20व्या वर्षानंतर नेत्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या अंगरक्षक किंवा इतर जवळच्या व्यक्तींची लग्न करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)