Vietnam Floods: 'व्हिएतनाम'मध्ये पावसाचा हाहाकार; पूर व भूस्खलनांमुळे 90 लोकांचा मृत्यू, 34 लोक बेपत्ता
व्हिएतनाममध्ये (Vietnam) मुसळधार पाऊस (Heavy Rains) आणि भूस्खलनांमुळे (Landslides) हाहाकार माजला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे (Flood) इथे आतापर्यंत 90 लोकांचा मृत्यू झाला आहे,
व्हिएतनाममध्ये (Vietnam) मुसळधार पाऊस (Heavy Rains) आणि भूस्खलनांमुळे (Landslides) हाहाकार माजला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे (Flood) इथे आतापर्यंत 90 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 34 लोक बेपत्ता आहेत. यापूर्वी बातमी आली होती की सैन्याच्या शिबिरात दरडी कोसळल्या असून, अबेक सैनिक मरण पावले आहेत आणि 22 सैनिक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांसाठी सरकारने शोध आणि बचाव मोहीम सुरु केली आहे. गेले दोन आठवडले सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले असल्याची माहिती, आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
मीडिया रिपोर्टनुसार व्हिएतनाममध्ये ऑक्टोबरपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले, सध्या इथल्या नद्यांची पाण्याची पातळी वीस वर्षांत सर्वाधिक आहे. भूस्खलनामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सेंट्रल स्टीयरिंग कमिटी फॉर नॅचरल डिझास्टर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, बहुतेक अपघातात Quang Tri, Thua Thien Hue आणि Quang Nam या प्रांतांमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. सोमवारी पहाटे 6 पर्यंत, Ha Tinh, Quang Binh, Quang Tri आणि Thua Thien Hue परिसरातील 121,280 लोकांसह सुमारे 37,500 घरांना सुरक्षित भागात हलविण्यात आले. सुमारे 121,700 घरे अजूनही पाण्याखाली असल्याचे समितीने म्हटले आहे. (हेही वाचा: Hong Kong कडून एअर इंडिया, विस्तारा फ्लाइट्सच्या उड्डाणावर येत्या 30 ऑक्टोंबर पर्यंत बंदी, प्रवासी COVID19 पॉझिटिव्ह आल्याने घेतला निर्णय)
15 ऑक्टोबरपासून जवळपास 531,800 जनावरे आणि कोंबड्या मृत्यू पावल्या आहेत. या मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे. व्हिएतनाम न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य नेन आणि हा टिन्ह प्रांतातील शाळांनी सोमवारपासून विद्यार्थ्यांना घरी राहण्याची परवानगी दिली आहे. यासह असे म्हटले आहे की बुधवारपर्यंत मध्य भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागात 600 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी झालेल्या आपत्कालीन बैठकीत सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)