Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या पाकिस्तानी मुलीची भारताकडून सुटका, आभार व्यक्त करतानाचा अस्मा शफीकचा व्हिडिओ व्हायरल

ती म्हणाली, कठीण परिस्थितीत आम्हाला मदत केल्याबद्दल मी कीवमधील भारतीय दूतावासाचे आभार मानते. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आभारी आहे . आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद. भारतीय दूतावासाच्या मदतीने, आम्ही आमच्या घरी सुरक्षित आहोत.

Pakistani student Asma Shafiq (Pic Credit - ANI)

पाकिस्तानच्या अस्मा शफीक (Asma Shafiq) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. वास्तविक, अस्मा युक्रेनमध्ये (Ukraine) अडकली होती आणि ती पाकिस्तानी विद्यार्थिनी (Pakistani student Asma Shafiq) आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेल्या युद्धादरम्यान अस्मा कीवमध्ये (Kyiv) अडकली होती. भारतीय दूतावासाच्या मदतीने अस्मा युक्रेनबाहेर सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकली. याबाबत त्यांनी एका व्हिडिओद्वारे भारतीय दूतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. अस्मा शफीक युक्रेनमधील सुमी स्टेट मेडिकल कॉलेजमध्ये (Sumi State Medical College) शिकते. आपण पाकिस्तानची असल्याचे सांगत तिने व्हिडिओ जारी केला आहे.

ती म्हणाली, कठीण परिस्थितीत आम्हाला मदत केल्याबद्दल मी कीवमधील भारतीय दूतावासाचे आभार मानते. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचीही आभारी आहे . आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद. भारतीय दूतावासाच्या मदतीने, आम्ही आमच्या घरी सुरक्षित आहोत. जाऊ शकलो.

रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, भारतासह जगातील अनेक देशांतील नागरिकांसह भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते.  युद्धाच्या काळात भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार ऑपरेशन गंगा मोहीम राबवत आहे. या मोहिमे अंतर्गत युक्रेनची राजधानी कीवसह इतर शहरांमधून हजारो विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. भारत सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 17 हजार विद्यार्थ्यांना परत आणले आहे. हेही वाचा Mumbai High Court Statement: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत हे दुर्दैवी, मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

त्याच वेळी, सुमीमध्ये अडकलेल्या 700 भारतीयांना काल म्हणजेच मंगळवारी ह्युमन कॉरिडॉरमधून शहराबाहेर आणण्यात आले. त्याचवेळी, रशियाने आज म्हणजेच बुधवारी पुन्हा एकदा युद्ध क्षेत्रातून लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धविराम जाहीर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी सकाळी ही घोषणा करण्यात आली.  रशियन सैनिकांनी मानवी कॉरिडॉर बनवून लोकांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now