Australian Parliament Leaked Video: ऑस्ट्रेलियाच्या संसद भवनात अश्लील कृत्याचे व्हिडिओ लिक; पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

ज्यात ते संसदेत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. यावरून आता ऑस्ट्रलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांच्यावर टीका होत आहे.

Australia's Prime Minister Scott Morrison (Photo Credits: Facebook)

Australian Parliament Leaked Video: ऑस्ट्रेलियन राजकारणात (Australian Politics) मंगळवारी सरकारी कर्मचार्‍यांवर बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपाखाली एक नवा वाद निर्माण झाला. अलीकडेचं ऑस्ट्रेलियाच्या कन्झर्व्हेटिव्ह सरकारच्या कर्मचार्‍यांचे काही लीक व्हिडिओ (Leaked Video) समोर आले आहेत. ज्यात ते संसदेत (Australian Parliament) अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. यावरून आता ऑस्ट्रलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांच्यावर टीका होत आहे. मॉरिसन यांनी या प्रकरणाला 'निंदनीय' आणि 'पूर्णपणे लज्जास्पद' (Absolutely Shameful) असं म्हटलं आहे.

स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी संसद भवनात सरकारी कर्मचार्‍यांनी केलेल्या घृणास्पद आणि लैंगिक कृत्याचा निषेध केला. सोमवारी रात्री न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया आणि चॅनल टेन न्यूजने वृत्त दिले की, संसदेत लैंगिक कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणार्‍या एका गटात चार वरिष्ठ सरकारी कर्मचारी सहभागी होते. यासंदर्भात सिन्हुआ या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. यात महिला खासदारांच्या डेस्कवर केलेल्या कृत्याचा समावेश आहे. एका निवेदनात मॉरिसन म्हणाले की, आरोपांच्या केंद्रस्थानी असलेल्या एका कर्मचाऱ्याला शोधून काढण्यात आले आहे. या कर्मचाऱ्याविरोधातील आरोप घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. माझ्या सरकारने या आरोपांच्या केंद्रस्थानी असलेल्या स्टाफ मेंबरची ओळख पटवून दिली असून त्याला तातडीने त्याला निलंबित करण्यात आलं आहे. (वाचा - Donald Trump यांची पुन्हा होणार Social Media वर वापसी; सुरु करू शकतात स्वतःचे नवे व्यासपीठ- Ex-Aide)

पंतप्रधान म्हणाले, या व्यक्तींच्या कृती संसदेत काम करणार्‍या लोकांचा आणि संसदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आदर्शांचा घृणास्पद अपमान करतात. हे खुलासे अशा वेळी करण्यात आले आहेत, जेव्हा संसद भवनमधील महिलांवरील संस्कृती आणि वागणूकीची तपासणी केली जात आहे.

माजी सरकारी कर्मचारी ब्रिटनी हिगिन्स यांनी फेब्रुवारी महिन्यात संसदेतील एका सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मार्च 2019 मध्ये केला होता. तर अॅटर्नी-जनरल क्रिश्चियन पोर्टरने आरोपानंतर सुट्टी घेतली होती. सोमवारी संध्याकाळी अर्थमंत्री सिमोन बर्मिंघम यांनी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif