Coronavirus: अमेरिकेत COVID-19 मृत्यूचे तांडव सुरुच! मागील 24 तासांत 1267 रुग्ण दगावल्याची जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिली माहिती
मागील 24 तासांत 1267 रुग्ण दगावल्याची माहिती AFP न्यूज एजन्सीने दिली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला असून अमेरिकेत (USA) तर अक्षरश: मृत्यूचे तांडव सुरु केले आहेत. मागील 24 तासांत 1267 रुग्ण दगावल्याची माहिती AFP न्यूज एजन्सीने दिली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 45,68,037 कोरोनाचे रुग्ण आढळले असून देशात 1,53,840 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ही धक्कादायक आकडेवारी पाहून अजूनही अमेरिकेत कोरोनाची स्थिती आटोक्यात आली नसल्याचे चित्र दिसत आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसागणिक वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे.
Worldometers वेबसाइटनुसार, जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 17,187,409 वर पोहोचली असून 6,70,201 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तसेच जगभरात आतापर्यंत 10,697,976 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रशियाकडून (Russia) येत्या दोन आठवड्यामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) वरील लसीला मान्यता मिळू शकते. असे झाल्यास कोरोना व्हायरस लसीला मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरु शकतो. 10 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी रशियाकडून कोरोना व्हायरसची लस तयार झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही लस मास्को (Moscow) येथील Gamaleya Institute ने तयार केली आहे.