US Presidential Election 2020: अमेरिकेची यंदाची राष्ट्रपती निवडणूक असेल देशातील सर्वात महागडी निवडणूक; जाणून घ्या होणारा खर्च
सध्या जोरदार उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. मात्र, ही निवडणूक देशाच्या इतिहासातील सर्वात महागडी निवडणूक होणार आहे.
अमेरिकेमध्ये राष्ट्रपती निवडणुकांचे (US Presidential Election 2020) बिगुल वाजले आहे. सध्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरु आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. मात्र, ही निवडणूक देशाच्या इतिहासातील सर्वात महागडी निवडणूक (Most Expensive Election) होणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीसाठी दुप्पट खर्च अपेक्षित आहे. यंदा सुमारे 14 अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. याबाबत रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स सेंटरने म्हटले आहे की, मतदानाच्या आधीच्या काही महिन्यात राजकीय निधीत मोठी वाढ झाली असून, या निवडणुकीत 11 अब्ज डॉलर्स इतका खर्च अपेक्षित होता.
मात्र आता ही आकडेवारी मागे पडली असल्याचे या संशोधन गटाने सांगितले आहे. त्यांचा अंदाज आहे की, 2020 च्या निवडणुकीत 14 अब्ज डॉलर्स खर्च होण्याचा अनुमान आहे व या रकमेने आधीचे सर्व विक्रम मोडले आहेत. या गटाच्या म्हणण्यानुसार, डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन अमेरिकन इतिहासातील पहिले उमेदवार असतील, ज्यांनी देणगीदारांकडून 1 अब्ज डॉलर्स जमा केले आहेत. 14 ऑक्टोबरला त्यांच्या मोहिमेस विक्रमी 93.8 दशलक्ष डॉलर्स मिळाले. त्याच वेळी, ट्रम्प यांनी प्रचारासाठी देणगीदारांकडून 596 दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत, जे बिडेनच्या जवळपास निम्मे आहे. (हेही वाचा: US: महिलांना Sex Slaves बनवून चालू होते लैंगिक अत्याचार; 'सेल्फ हेल्प' गुरु Keith Raniere ला 120 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)
या ग्रुपने एका निवेदनात म्हटले आहे की, साथीचा रोग असूनही सामान्य माणसे असोत किंवा अब्जाधीश, प्रत्येकजणच 2020 च्या निवडणुकीत जास्त पैसे दान करीत आहे. यावेळी महिलांनी देणगीचा विक्रम मोडला आहे. अमेरिकन राजकारणात खर्च केलेल्या पैशांचा निवडणूक आणि सार्वजनिक धोरणावर होणाऱ्या परिणामांवर नजर ठेवणारा स्वतंत्र आणि नफा न घेणारा संशोधन गट, ’सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स’ च्या म्हणण्यानुसार यावर्षीच्या निवडणुकीत मागील दोन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. कार्यकारी संचालक शीला क्रूमहोल्झ म्हणाल्या, '2020 च्या मध्यादरम्यान देणगीदारांनी विक्रमी रक्कमेची गुंतवणूक केली आणि हा कल 2020 पर्यंत सुरू राहील.'