US: डोनाल्ड ट्रंम्प यांची COVID19 Relief Package वर स्वाक्षरी, अमेरिकेतील नागरिकांना मिळणार आर्थिक मदत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प (Donald Trump) यांनी कोविड19 रिलिफ पॅकेजवर (COVID19 Relief Package) अखेर स्वाक्षरी केली आहे.
US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प (Donald Trump) यांनी कोविड19 रिलिफ पॅकेजवर (COVID19 Relief Package) अखेर स्वाक्षरी केली आहे. White House कडून रविवारी रात्री घोषणा करत राष्ट्राध्यक्षांनी यावर स्वाक्षरी केल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता कोरोनामुळे फटका बसलेल्यांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रंम्प यांनी या पॅकेजला मंजूरी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.(COVID-19 Vaccine Update: 60 वर्षांवरील नागरिकांवर Sputnik V लसीचा वापर करण्यास रशियाची मंजूरी)
व्हाइट हाउसने असे म्हटले की, डोनाल्ड ट्रंम्प यांनी 900 बिलियन अमेरिकन डॉलरच्या कोविड19 रिलिफ पॅकेजवर स्वाक्षरी केली आहे. दोन महिन्यांपर्यंत बातचीत नंतरच सिनेटकडून गेल्या सोमवारी या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. या पॅकेजमध्ये अमेरिकेतील नागरिकांना 600 डॉलरचा चेक देण्याचा प्रस्ताव असून जे वर्षाला $75,000 पेक्षा कमी कमवतात. डोनाल्ड ट्रंम्प यांनी या पॅकेजवर आपले मत देत असे म्हटले होते की, मदत निधीमध्ये वाढ करण्यात यावी.(UK-India Flights Suspension: 31 डिसेंबर पर्यंत युके मधून भारतामध्ये येणारी सारी विमानं New Mutant of Coronavirus भीतीच्या पार्श्वभूमीवर रद्द)
Tweet:
डोनाल्ड ट्रंम्प यांनी असे म्हटले होते की, खर्चात कमी करुन रिलिफ पॅकेजमधील रक्कम ही वाढवली पाहिजे. तसेच काँग्रेसला स्पष्ट संदेश देत असे ही म्हटले की, खर्चात कपात करुन चेकवरील रक्कम $2000 करण्यात यावी. मात्र आता त्यांनी या पॅकेजवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे लोकांनी आता आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, अमेरिकेत अन्य महिन्यांपेक्षा डिसेंबर महिन्यात कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेल्याचे समोर आले आहे. याबद्दल कोविड ट्रॅकिंग करणाऱ्या प्रोजेक्टकडून ही माहिती दिली गेली आहे.