US President Donald Trump यांनी 2017 मध्ये भारतामध्ये भरला 1,45,400 डॉलर्सचा कर, तर अमेरिकेमध्ये जमा केले फक्त 750 डॉलर्स; 2016 आधी 15 पैकी 10 वर्षांत कर भरलाच नाही 

अमेरिकेचे प्रमुख वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाईम्स'ने (The New York Times) एका अहवालात खुलासा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या कंपन्यांनी 2017 मध्ये भारतात कर रूपाने 145,400 डॉलर्स (अंदाजे 1,07,36,045.20 रुपये) भरले होते

US President Donald Trump यांनी 2017 मध्ये भारतामध्ये भरला 1,45,400 डॉलर्सचा कर, तर अमेरिकेमध्ये जमा केले फक्त 750 डॉलर्स; 2016 आधी 15 पैकी 10 वर्षांत कर भरलाच नाही 
President Donald Trump | (Photo Credits: AFP)

अमेरिकेचे प्रमुख वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाईम्स'ने  (The New York Times) एका अहवालात खुलासा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या कंपन्यांनी 2017 मध्ये भारतात कर रूपाने 145,400 डॉलर्स (अंदाजे 1,07,36,045.20 रुपये) भरले होते, तर अमेरिकेत फक्त 750 डॉलर (अंदाजे 55,378.50 रुपये) जमा केले आहेत. यामध्ये असेही म्हटले आहे की, गेल्या 15 वर्षांपैकी त्यांनी 10 वर्षांत कोणताही कर भरला नाही. त्यांनी त्यांच्या कमाईपेक्षा तोटाच अधिक दाखवला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी या अहवालाला पूर्णपणे खोटी बातमी असल्याचे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर मोठा विजय मिळविला होता. अहवालानुसार, ट्रम्प यांनी फेडरल इनकम टॅक्सचे अध्यक्ष झाल्यानंतर केवळ 750 डॉलर्स जमा केले आहेत. व्हाईट हाऊस येथे पहिल्या वर्षाच्या दरम्यान, त्यांनी पुन्हा 750 डॉलर्स भरले. गेल्या 20 वर्षातील कर परतावा आकडेवारीवरून वर्तमानपत्राने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

आधीच्या मीडिया रिपोर्टनुसार ट्रम्प ऑर्गनायझेशनची सर्वात मोठी परदेशी कार्ये भारतात आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत त्यांच्या भारतीय व्यवसायांनी 2.3 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. परदेशातील इतर कमाईमध्ये 73 दशलक्ष डॉलर्स स्कॉटलंड आणि आयर्लंडमधील त्यांची संपत्ती, फिलिपिन्सची 3 मिलियन डॉलर आणि तुर्कीची एक मिलियन डॉलर्स होती.

ट्रंप यांची डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासमवेत अध्यक्षीय चर्चेच्या आधी हा अहवाल आला आहे. ही चर्चा मंगळवारी होणार आहे, तर अमेरिकेत 3 नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. (हेही वाचा: Johnson & Johnson कंंपनी कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात- डोनाल्ड ट्रंप)

दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना वैयक्तिक वित्तविषयक माहिती सार्वजनिक करणे कायद्याने बंधनकारक नाही. परंतु रिचर्ड निक्सन यांनी असे केल्यानंतर सर्व अध्यक्ष आतापर्यंत ही माहिती देत आले ​​आहेत. ट्रम्प हे पहिले अध्यक्ष आहेत ज्यांनी आपल्या कर भरण्याविषयी कोणतीही माहिती दिली नाही आणि ती लपविली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us