Coronavirus Outbreak: अमेरिकेमध्ये Social Distancing 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याचे आदेश

दरम्यान जितकं सोशल डिस्टन्सिंग पाळाल तितकं आपण या महासंकटातून लवकर बाहेर पडू शकतो असा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे.

US President Donald Trump (Photo Credits: Getty Images)

दिवसागणिक अमेरिकेमध्ये कोव्हिड 19 या आजाराने मृत्यूमुखी पडणार्‍यांचा संख्या वाढत आहे. अशामध्येच लॉकडाऊनला विरोध करणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये सोशल डिस्टन्सिंगची कालमर्यादा 30 एप्रिल पर्यंत वाढवत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान जितकं सोशल डिस्टन्सिंग पाळाल तितकं आपण या महासंकटातून लवकर बाहेर पडू शकतो असा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे. सध्या चीन पाठोपाठ स्पेन आणि इटलीनंतर अमेरिका हे कोरोना व्हायरस संक्रमणाचं केंद्र बनलं आहे. सध्या अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा लाखाच्या पार आहे. दरम्यान हा जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित आकडा आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, जर्मनी मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष सोय; मदतकेंद्रांची यादी जाहीर.

डॉनल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान येत्या 2 आठवड्यामध्ये कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा कळस गाठेल. मात्र यंदाच्या ईस्टर संडे (12 एप्रिल) पर्यंत हे प्रमाण कमी होण्यास सुरूवात होईल असा दावाही त्यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना केला आहे. सध्या अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांपैकी 24,000 लोकांनी आपला जीव गमावला आहे. Coronavirus: अमेरिकेत बेरोजगारीने मोडला विक्रम; तब्बल 33 लाख लोकांनी केला Unemployment Benefits साठी अर्ज

Tweet

ट्रम्प सरकारने अमेरिकेमध्ये 16 मार्चपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अमेरिकेतील जनतेसाठी, बेरोजगारांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. सध्या अमेरिकेमध्ये अडकलेल्या काही पर्यटकांना मायदेशी परत नेण्यासाठीदेखील अमेरिका प्रयत्नशील आहे. अमेरिकेमध्ये न्यू जर्सी, न्यूयॉर्क या शहरांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक आहे.