Coronavirus: यूएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कन्या इवांका ट्रम्प यांच्या खासगी स्वीय सहायकास कोविड 19 विषाणूची बाधा

तर आतापर्यंत 1,283,929 अमेरिकी नागरिकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे.

Ivanka Trump | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची कन्या आणि व्हाइट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार इवांका ट्रम्प (Ivanka Trump) यांच्या खासगी स्वीय सहायकास कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन झाल्याचे वृत्त आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. सीएएनच्या वृत्ताचा दाखला देऊन वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने आयएनएसने हे वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, इवांका याचे खासगी स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीस कोविड 19 विषाणूची बाधा झाली आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्रापती माइक पेन्स यांच्या सेक्रेटरी केटी मिलर यांची कोरोना व्हायरस चाचणीक पॉजिटीव्ह आल्यानंतर इवांका यांच्या स्वीय सहायकाबाबतची बातमी आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमण वेगाने वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करत व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केलिग मॅकनानी यांनी शुक्रवारी ब्रिफिंगदरम्यान सांगितले की, कर्मचाऱ्यांमध्ये होणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत.

इवांका यांचे पती जेरेड कुशनर हेसुद्धा वरिष्ठ सल्लागार आहेत. तसेच, इवांका आणि कुशनर यांची कोरोना व्हारस चाचणी निगेटीव्ह आल आहे. पेन्स यांच्यासोबत कोरोना व्हायरस प्रादुर्भाव होण्याबासून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. त्याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की मी पूर्णपणे निश्चिंत आहे. कारण, व्हाईट हाऊसमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.(हेही वाचा,Coronavirus Outbreak: जगभरात एकूण 40 लाख कोरोना बाधित तर 2 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू )

ट्रम्प यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्याने सांगिले की, कोरोना व्हायरस या घातक आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी घेण्यबद्दल व्हाईट हाऊसला सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आजघडीला जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही अमेरिकेमध्ये आहे. जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार शनिवारपर्यं अमेरिकेतील कोरना व्हायरस संक्रमन झालेल्या व्यक्तिंच्या मृत्यूची संख्या तब्बल 77,180 इतकी आहे. तर आतापर्यंत 1,283,929 अमेरिकी नागरिकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे.