अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden कोविड 19 निगेटिव्ह होताच पुन्हा काही दिवसांत पॉझिटिव्ह; 'Rebound' Case
21 जुलै दिवशी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी ते निगेटीव्ह देखील झाले होते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden हे कोविड 19 च्या "Rebound" Case मध्ये पुन्हा कोविड 19 पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी कोविड 19 चे उपचार झाले आणि त्यांचा आयसोलेशन काळ संपला तेव्हा टेस्ट निगेटिव्ह आली आणि आता परत ते पॉझिटीव्ह झाल्याचे समोर आल्याची माहिती व्हाईट हाऊस मधून देण्यात आली आहे.
व्हाईट हाऊस मधील फिजिशियन Kevin O'Connor यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींना लक्षणं नाहीत पण त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवले जाणार आहे. पण सध्या त्यांची स्थिती पाहता पुन्हा त्यांच्यावर उपचार सुरू करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतू त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे. नक्की वाचा: Omicron Virus: जगभरात 110 देशांमध्ये वाढतोय Coronavirus, ओमायक्रोन संक्रमितांची संख्याही वाढली, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा.
जो बायडन हे 79 वर्षीय आहेत. 21 जुलै दिवशी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी ते निगेटीव्ह देखील झाले होते. दरम्यान त्यांनी कोविड 19 लसीचा डोस घेतला आहे दोनदा बुस्टर डोस देखील घेतला आहे. त्यांच्यावर Paxlovid ही अॅन्टीवायरल थेरपी घेण्यात आली आहे. फायझर कडून ही उपचार पद्धती बनवण्यात आली आहे.