अमेरिका: व्हर्जिनिया येथे सरकारी कर्मचाऱ्याकडून अंदाधुंद गोळीबार, 12 जणांचा मृत्यू
या प्रकरणी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिका (America) मधील व्हर्जिनिया (Virginia) येथे एका सरकारी कर्मचाऱ्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणी 12 जणांचा मृत्यू झाला असून 5 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
सिटी ऑफ व्हर्जिनिया बीच जवळील महापालिकेच्या इमारतीत सरकारी कर्मचाऱ्याकडून गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर गोळीबारात हल्लेखोरचा सुद्धा मृत्यू झाला असून जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मात्र नेमका गोळीबार कोणत्या कारणास्तव करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. त्याचसोबत व्हर्जिनिया बीचच्या इतिहासातील हा अत्यंत वाईट दिवस असल्याचे महापालिकेचे महापौर बॉब डायर यांनी म्हटले आहे.