US Mother Killed Adopted Children: दत्तक घेतलेल्या दोन मुलांना ठेवले उपाशी; नंतर मारहाण करून केली हत्या, 63 वर्षीय आईला अटक
त्यातील लंडन 2019 मध्ये शेवटची पाहिली गेली होती, परंतु तिच्या आईने कधीही ती हरवल्याची तक्रार केली नाही.
US Mother Killed Adopted Children: अमेरिकेत (US) एका 63 वर्षीय महिलेने आपल्या दोन दत्तक मुलांची (Adopted Children) हत्या केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण जुने आहे, जे आता समोर आले आहे. हत्येपूर्वी महिलेने मुलांवर अत्याचार केले होते. त्यांना उपाशी ठेवले होते तसेच मारहाणही करण्यात आली होती. या दोन दत्तक मुलांचे मृतदेह जळलेल्या ड्रममध्ये सापडल्यानंतर त्यांच्या आईवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला.
इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, अवंता देवेनची (Avantae Deven) दोन्ही दत्तक मुले- मुलगा ब्लेक आणि मुलगी लंडन अनेक वर्षांपासून दिसली नव्हती. त्यातील लंडन 2019 मध्ये शेवटची पाहिली गेली होती, परंतु तिच्या आईने कधीही ती हरवल्याची तक्रार केली नाही. ब्लेक 2022 पासून दिसला नव्हता, त्यानंतरही देवेनने त्याच्या हरवल्याची तक्रार केली नाही.
देवेनच्या अजून एका दत्तक मुलाने 2023 मध्ये मानसिक समस्यांबाबत अधिकाऱ्यांना फोन केला होता. त्यावेळी महिलेची दोन मुले बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यांनतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना कॉल करून दोन मुले गायब असल्याची माहिती दिली. नंतर पोलिसांनी कुटुंब राहत असलेल्या घराची तपासणी केली, तेव्हा त्यांना एक जळालेला ड्रम सापडला, ज्यामध्ये अर्धवट मानवी अवशेष होते. फॉरेन्सिक चाचण्यांमध्ये ते अवशेष 15 ते 19 वयोगटातील महिला आणि 7 ते 10 वयोगटातील पुरुष असल्याचे स्पष्ट झाले. (हेही वाचा: Badminton Player Dies on Court: सामना खेळताना कोर्टवर कोसळला, 17 वर्षीय चिनी बॅडमिंटनपटूचा मृत्यू; PV Sindhu कडून दु:ख व्यक्त)
तपासणीमध्ये मुलांचा मृत्यू उपासमार आणि आरोग्याच्या दुर्लक्षामुळे झाल्याचे समोर आले. देवेनने मुलांवर अत्याचार केले होते आणि शेवटी त्यांची हत्या करून त्यांचे तुकडे केले, असे तपासकर्त्यांचे मत आहे. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, ब्लेक आणि लंडन यांना अनुक्रमे 2013 आणि 2011 मध्ये देवेनने दत्तक घेतले होते. या आठवड्यात अधिका-यांनी जाहीर केलेल्या तपशिलांवरून असे दिसून आले की, देवेनकडे असताना मुले अतिशय क्रूर परिस्थितीत जगले होते. त्यांना कोंडून ठेवण्यात आले होती, त्यांची उपासमार झाली होती तसेच त्यांना मारहाणही केली होती.
आता एका पत्रकार परिषदेदरम्यान पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे मुलांच्या आईवर असलेल्या आरोपांचे समर्थन करणारे फॉरेन्सिक पुरावे आहेत. देवेनवर फर्स्ट-डिग्री खून, मृत्यू लपवणे, अपहरण आणि लहान मुलांवर अत्याचार करणे अशा अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तील कंबरलँड काउंटी डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.