US Immigrants Deportation Plan: अमेरिकेतून 18 हजार भारतीयांना परत पाठवले जाणार; बहुतांश लोक गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील
गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये अमेरिकेची सीमा ओलांडताना सरासरी 90,000 भारतीय पकडले गेले आहेत. हे आकडे अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा वाढता कल दर्शवतात.
US Immigrants Deportation Plan: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच निर्वासितांच्या हद्दपारीच्या योजनेवर काटेकोरपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दपारी योजनेंतर्गत (Deportation Plan), अमेरिकेत राहणाऱ्या सुमारे 18,000 भारतीयांना आता अमेरिकेतून हद्दपार होण्याचा धोका आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हे धोरण लागू केले जाईल. हे पाऊल अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या निर्वासन मोहिमेपैकी एक मानले जात आहे. यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट (ICE) च्या अहवालानुसार, 18,000 भारतीयांचा हद्दपारीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
यातील बहुतांश लोक गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील आहेत. एकूणच, यूएसमध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या सुमारे 7,25,000 आहे, जी मेक्सिको आणि एल साल्वाडोर नंतर तिसरी आहे.
चार्टर्ड फ्लाइट्सद्वारे हकालपट्टी-
ऑक्टोबर 2024 मध्ये, यूएसने भारतीय नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटचा वापर केला. हे पाऊल यूएस होमलँड सुरक्षा विभाग आणि भारत सरकारच्या सहकार्याने उचलण्यात आले. भारत सरकारने म्हटले आहे की, गेल्या एका वर्षात एकूण 519 भारतीय नागरिकांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन आझाद यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार, या भारतीय नागरिकांना नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत भारतात पाठवण्यात आले होते.
बेकायदेशीर सीमा ओलांडणाऱ्यांची संख्या वाढली-
गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये अमेरिकेची सीमा ओलांडताना सरासरी 90,000 भारतीय पकडले गेले आहेत. हे आकडे अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा वाढता कल दर्शवतात.
'असहकार' देशांच्या यादीत भारत-
यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटने भारताला 'असहकार' देशांच्या यादीत स्थान दिले आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून नागरिकत्व पडताळणी, प्रवासी कागदपत्रे जारी करणे आणि हद्दपारीची प्रक्रिया यामध्ये होणारा विलंब यामुळे हे घडले आहे. यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटनुसार, गैर-सहकारी देशांच्या यादीत भारतासह चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराण सारख्या 15 इतर देशांचाही समावेश आहे. (हेही वाचा: International Students in Canada: पुढील वर्षी 7 लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागेल; लाखो भारतीय मुलांचे भविष्य अंधारात, जाणून घ्या कारण)
अमेरिकेतून काढून टाकण्याच्या यादीतील इतर देशांची स्थिती-
यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट अहवालानुसार, अशा यादीत सर्वाधिक लोक होंडुरास (2,61,651) आहेत, त्यानंतर ग्वाटेमाला, मेक्सिको आणि एल साल्वाडोर यांचा क्रमांक लागतो.
हकालपट्टी धोरणाचा परिणाम-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणामुळे स्थलांतरितांसाठी गंभीर समस्या तर निर्माण होत आहेच, पण त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. या धोरणामुळे हजारो भारतीयांना त्यांच्या भविष्याबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)