US: कृषी कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान Washington DC मधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना
नव्या कृषी कायद्याविरोधात पेटलेल्या आंदोलनाचे पडसाद आता अमेरिकेतही उमटू लागले आहेत.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात (Farms Law) देशातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. नव्या कृषी कायद्याविरोधात पेटलेल्या आंदोलनाचे पडसाद आता अमेरिकेतही (America) उमटू लागले आहेत. शनिवार, 12 डिसेंबर रोजी वॉशिंग्टन डीसी (Washington DC) बाहेरील महात्मा गांधीच्या पुतळ्याची (Mahatma Gandhi Statue) विटंबना करण्यात आली. आंदोलकांनी पुतळ्यावर खलिस्तान ध्वज फडकविला. दरम्यान, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, "अमेरिकन कायदा अंमलबजावणी करणार्या एजन्सींकडे तीव्र निषेध नोंदविला आहे. तसंच लागू कायद्यान्वये दोषींची चौकशी आणि कारवाई यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडेही मागणी केली आहे."
शांतता आणि न्यायाच्या सार्वभौम प्रतिष्ठित चिन्हाचा निषेध करणार्या या भयावह कृत्याचा दूतावास तीव्र निषेध करतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Farmer's Protest: कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक; दिल्ली-जयपूर महामार्ग रोखणार)
ANI Tweet:
पत्रकारांशी बोलताना शेतीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या संयोजकांपैकी एकाने म्हटले, “प्रत्येकाला आत्मनिर्णयाचा हक्क आहे. तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहात, हे महत्त्वाचे आहे.
पुढे ते म्हणाले की, भारतातील पंजाब मधील शेतकरी कृषी कायद्याविषयी आवाज उठवत असताना सरकार त्यावर काहीच उत्तर का देत नाही. शिखांनी आतापर्यंत कधीच कोणाला त्रास दिलेला नाही आणि याची जगाच्या इतिहासात नोंद आहे. त्यामुळे आपण त्यांना कोणत्याही बाजूने दहशतवादी म्हणू शकत नाही.