US: वडीलांच्या बंदुकीशी खेळ जीवावर बेतला, खेळता खेळता सुटली गोळी, लगानग्याचा मृत्यू, एक जखमी

वडिलांच्या बंदुकीसोबत खेळत असताना अचानक सुटलेल्या गोळीमुळे एक वर्षांची लहान मुलगी जागीच ठार झाली आहे. तर तिची दुसरी बहीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना अमेरिकेत (US) घडली.

Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

आपल्या वडीलांच्या बंदूकीसोबत (Gun) खेळणे एका मुलाच्या जीवावर बेतले आहे. वडिलांच्या बंदुकीसोबत खेळत असताना अचानक सुटलेल्या गोळीमुळे एक वर्षांची लहान मुलगी जागीच ठार झाली आहे. तर तिची दुसरी बहीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना अमेरिकेत (US) घडली. या प्रकरणात बंदुकीसोबत खेळणाऱ्या आठ वर्षीय मुलाचे 45 वर्षीय वडील रॉडरिक रान्डेल (Roderick Randall) याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एस्कैम्बिया काउंटी शेरिफ चिप सिमंस यांनी म्हटले आहे. रॉडरिक रान्डेल याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

रॉडरिक रान्डेल याच्यावर बाळगलेली बंदूक निष्काळजीपणे हाताळणे आण पूरावा नष्ट करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना अमेरिकेतील मोटल येथे झाली. रान्डेल हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मुलासोबत आला होता. त्याच्या प्रेयसीला दोन वर्षांची जुळी मुले होती. तीसुदधा आपल्या एक मुलांना घेऊन प्रियकर रॉडरिक रान्डेल याला भेटण्यास आली होती. रान्डेल हा पिस्तूल कपाटात ठेवण्यास विसरला होता. त्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा, काय सांगता? 40 वर्षांच्या महिलेने दिले 44 मुलांना जन्म; पतीने सोडल्यानंतर एकटी करत आहे सांभाळ)

दरम्यान, शेरिफ यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, रान्डेल याने आपल्या मुलाला बंदुक कोठे ठेवण्यात आली आहे याची माहिती दिली आहे. वडील बाहेर गेल्याचे पाहताच त्याने बंदूक बाहेर काढली आणि खेळायला सुरुवात केली. या वेळी रान्डेल याची प्रेयसी झोपली होती. त्याच्या मुलाने बंदूक बाहेर काढली आणि खेळायला सुरुवात केली. चुकून त्याच्याकडून गोळी सुटली आणि रान्डेल याच्या प्रेयसीच्या मुलीला लागली. ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. दुसरी मुलगीही गंभीर जखमी झाली.