Coronavirus: आमचे COVID-19 बाबतचे संशोधन चोरले; अमेरिकेचा चीनवर आरोप
माइक पोम्पिओ यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही माहिती देण्याऐवजी हा देश पीआरसी संबंधीत संयुक्त राज्य अमेरिकेतून कोविडशी संबंधीत माहिती चोरण्याचा प्रयत्न करतो आहे.
अमेरिकेचे (US) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रशासनाने चीनवर गंभीर आरोप केला आहे. चीनने अमेरिकेचे कोविड 19 (Covid-19) बाबातचे संशोधन चोरल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेचे हे आरोप उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण करणारे ठरु शकतात. असे तज्ज्ञांचे म्हणने आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी गुरुवारी रात्री उशीरा ट्विट करत म्हटले आहे की, ज्या देशात कोरोना व्हायरस निर्माण झाला आणि ज्या देशाने ही महामारी पसरु दिली त्या देशाने कोविड विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी माहिती प्रसिद्ध करायला हवी. त्या देशाने जगाची मदतही करायला हवी.
माइक पोम्पिओ यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही माहिती देण्याऐवजी हा देश पीआरसी संबंधीत संयुक्त राज्य अमेरिकेतून कोविडशी संबंधीत माहिती चोरण्याचा प्रयत्न करतो आहे. माइक यांनी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला इशारा देत म्हटले आहे की, ही अत्यंत दूर्दैवी बाब या देशाने टाळायला हवी. (हेही वाचा, Coronavirus: चीन सोबत सर्व संबंध तोडून टाकण्याचे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची क्षी जिनपिंग यांना अप्रत्यक्ष धमकी)
ट्विट
चीनच्या जखमेवर मीठ चोळत माइक पोम्पेओ यांनी म्हटले की, अमेरिका तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग कंपनी (टीएसएमसी)चे आम्ही स्वागत करतो. आम्ही जगातील सर्वात प्रगत 5 नॅनोमीटर सेमीकंडक्टर फाऊंड्रीत 12 अब्ज डॉलर गुंतवण्याचा विचार करतो आहोत. पोम्पिओ आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात 'एका बाजूला चन अत्याधुनीक तंत्रज्ञानावर आपली पकड मजबुत ठेवत आहे तर दुसऱ्या बाजूला महत्त्वपूर्ण उद्योग आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न करत आहे. '