तब्बल 10 हजार उंटांची गोळ्या घालून करणार हत्या: ऑस्ट्रेलियात जंगलांला लागलेल्या वणव्यानंतर स्थानिक प्रशासनाचा धक्कादायक निर्णय; जगभरातील प्राणीमित्र हैराण
दुष्काळाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्रशासनाने धक्कादायक निर्णय घेतला आहे. तुम्हीही हा निर्णय ऐकून नक्की थक्क व्हाल. ऑस्ट्रेलियामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने सुमारे 10 हजार उंटाना ठार करण्यात येणार आहे. उंटाना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली असून ही मोहिम पुढील 5 दिवस चालणार आहे.
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे तेथे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्रशासनाने धक्कादायक निर्णय घेतला आहे. तुम्हीही हा निर्णय ऐकून नक्की थक्क व्हाल. ऑस्ट्रेलियामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने सुमारे 10 हजार उंटाना ठार (Camels Killed) करण्यात येणार आहे. उंटाना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली असून पुढील 5 दिवस ही मोहिम चालणार आहे.
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे 50 कोटीपेक्षा अधिक वन्य प्राण्याचा जीव गेला. यात काओला या प्राण्यांची संख्या जास्त आहे. ही आग थांबवण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, असं असताना 10 हजार उंटाची हत्या करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या उंटाना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे. तसेच हे उंट पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येत आहेत. त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाण्याचा शोध घेत आलेले उंट माणसांना पायदळी तुडवत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे. याबाबत 'सीबीएस न्यूज' या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे. (हेही वाचा - ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीत 48 कोटी प्राणी आणि पक्षांचा होरपळून मृत्यू)
या उंटाना प्रोफेशनल शूटर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने ठार करणार आहेत. या वृत्तामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु, हे वृत्त खरे असून आजपासून या मोहिमेला सुरुवातही झाली आहे. ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीनंतर तेथील स्थानिक नागरिकांनी अनेक प्राण्यांचा जीव वाचवला. पंरतु, आता ऑस्ट्रेलिया प्रशासनचं 10 हजार उंटाची हत्या करणार आहे.