अमेरिकी सैन्याकडून Abu Bakr al-Baghdadi चा खात्मा? डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्वीट ने चर्चांना उधाण
आंतरराष्ट्रीय वृत्त संस्था राऊटर्सने दिलेल्या माहितीचा दाखला देत ANI ने बगदादीचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील Something very big has just happened! असं ट्वीट केल्याने आता याविषयी राजकीय क्षेत्रात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.
अमेरिकेने 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' चा म्होरका अबू बकर अल-बगदादी (Abu Bakr al-Baghdadi)ला निशाणा करत दहशतवाद विरोधी एक मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्त संस्था राऊटर्सने दिलेल्या माहितीचा दाखला देत ANI ने बगदादीचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील Something very big has just happened! असं ट्वीट केल्याने आता याविषयी राजकीय क्षेत्रात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. अद्याप अमेरिकेकडून किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
अबू बकर अल-बगदादी हा आयएस या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असून इराक आणि सिरियामध्ये वासत्व्यास होता. सारं जग इस्लाममय करण्याचं स्व्पन साकरण्यासाठी तो अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत होता. कट्टर विचारसरणीच्या बगदादीने स्वतःच्या कुटुंबीयांवरही अत्याचार केले होते.
ANI Tweet
The United States has carried out an operation targeting Islamic State leader Abu Bakr al-Baghdadi: Reuters (file pic) pic.twitter.com/tH1KUmDXaG
— ANI (@ANI) October 27, 2019
Donald Trump Tweet
Something very big has just happened!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 27, 2019
बगदादी मारला गेल्याचे वृत्त यापूर्वीही अनेकदा आली होती मात्र त्याची अधिकृत माहिती कधीच समोर आली नाहीत. सीरीयाने काही दिवसांपूर्वी त्यांचं सैन्य हटवल्यानंतर आता अमेरिकी सैन्याने ही कारवाई केली असल्याचं समजत आहे. हवाई हल्ल्याच्या मध्यमातून ही कारवाई केली असल्याचेही मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2019 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

