IPL Auction 2025 Live

Unemployment In US: कोरोना व्हायरस संकटामुळे अमेरिकेत बेरोजगारीचा हाहाकार; 44 लाख नवीन लोकांसह एकूण 2.6 कोटी लोकांचे बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज

सध्या लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे,

Job (Photo Credits: Twitter)

तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, अजूनही चीन पासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना जगातील अनेक देश करत आहेत. सध्या लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे, व्यवसाय ठप्प आहेत व त्यामुळे बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण वाढत आहे. अमेरिकेत (US) कामावरून काढून टाकलेल्या जवळपास 44 लाख लोकांनी बेरोजगारी भत्ता अथवा त्यासंदर्भात लाभ (Unemployment Benefits) मिळावा यासाठी अर्ज केला आहे. गुरुवारी अमेरिकन सरकारने याबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरस उद्रेक झाल्यापासून अमेरिकेत अशा लोकांची संख्या वाढून 26 दशलक्ष झाली आहे.

लॉक डाऊनमुळे मागील काही दिवसांत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. याबाबत अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की, यंदा एप्रिल महिन्यात अमेरिकेत बेरोजगारांची संख्या 20 टक्क्यांनी वाढू शकते. या लॉक डाऊनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. आता येणारी आर्थिक मंदी ही 1930 च्या 'द ग्रेट डिप्रेशन' पेक्षाही भयानक असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतात की 2009 च्या तुलनेत अमेरिकेच्या उत्पादनात दुप्पट घसरण होऊ शकते. तसेच कामगार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 1982 मध्ये 6 लाख 95 हजार लोक बेरोजगार झाले होते.

अमेरिकेत कोरोना व्हायरसचा उद्रेक हा फार मोठा असून, बुधवारी हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या वृत्तानुसार इथल्या मृत्यूंची संख्या 46,583 वर पोहचली. दरम्यान, अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहातील सभासदांनी मार्चच्या उत्तरार्धात $2.2 ट्रिलियन डॉलर्सच्या कॅरेस कायद्याच्या आधारे $ 480अब्ज डॉलर्सच्या कोरोना व्हायरस मदत पॅकेजवर मतदान केले. या नवीन पॅकेजद्वारे लघु उद्योगांना $320 रुपयांची मदत केली जाईल, जेणेकरून ते आपल्या कर्मचाऱ्यांचा पागार देऊ शकतील. (हेही वाचा: Coronavirus: अमेरिकेत बेरोजगारीने मोडला विक्रम; तब्बल 33 लाख लोकांनी केला Unemployment Benefits साठी अर्ज)

अमेरिकेत सध्या एकूण 1.6 लोकांना बेरोजगारी भत्ता मिळत आहे, 2010 मध्ये 1.2 टक्के लोकांना मिळत असे. याआधी मार्चच्या शेवटच्या आढवड्यात अमेरिकेतील 3.3 दशलक्ष लोकांनी स्वत: ला बेरोजगार म्हणून घोषित केले होते.