UK Sperm Donations: यूकेमधील पुरुषांची स्पर्मची मागणी वाढली; जगभरात केली जात आहे निर्यात, जाणून घ्या सविस्तर
मात्र देशातून परदेशात शुक्राणू किंवा अंडी पाठवण्यावर कोणतेही बंधन नाही. यामुळेच यूकेमधील शुक्राणूंची मागणी वाढत आहे.
UK Sperm Donations: गेल्या काही वर्षांत शुक्राणू दातांच्या (Sperm Donors) मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही देशांमध्ये ‘स्पर्म डोनर’ हा व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. त्यांची मागणी जगभरात वाढत आहे. विशेषत: यूकेमधील (UK) दातांच्या शुक्राणूच्या मागणीमध्ये खास वाढ दिसून आली आहे. यूकेच्या स्पर्म डोनर्सचे स्पर्म जगभरातील विविध देशांमध्ये पाठवले जात आहेत. नुकतेच याबाबत एक संशोधन समोर आले आहे. या अहवालात नमूद केले आहे की, यूकेमधून जास्तीत जास्त शुक्राणूंची निर्यात केली जात आहे. यामुळे जगभरात मोठ्या संख्येने जन्मलेल्या सावत्र भावंडांची संख्या वाढत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूकेमध्ये नियम आहे की, फर्टिलिटी क्लिनिकमध्ये 10 पेक्षा जास्त कुटुंबे तयार करण्यासाठी एकाच दात्याचा वापर केला जाऊ शकत नाही. मात्र देशातून परदेशात शुक्राणू किंवा अंडी पाठवण्यावर कोणतेही बंधन नाही. यामुळेच यूकेमधील शुक्राणूंची मागणी वाढत आहे.
युकेमध्ये अनेक लोकांना, विशेषतः महिला आणि समलिंगी जोडप्यांना गर्भधारणा करण्यात अडचणी येत आहेत. अशात प्रजनन उपचारांच्या वाढत्या मागणीमुळे शुक्राणू दानाची गरज वाढली आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि इतर सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (ART) च्या वाढत्या वापरामुळे, शुक्राणू बँकांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. समाजातील कुटुंब नियोजनाच्या ट्रेंडमध्येही बदल झाला आहे. आजच्या काळात अनेकजण लग्न आणि पारंपरिक कौटुंबिक जीवन सोडून, करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यानंतर जर ते कुटुंब तयार करण्याचा निर्णय घेत असतील आणि जर कुटुंब नियोजन उपलब्ध नसेल तर ते स्पर्म बँकची मदत घेतात.
याव्यतिरिक्त, अविवाहित महिला आणि समलैंगिक जोडपी देखील स्पर्म डोनेशन सेवेकडे वळत आहेत, जे पारंपारिक प्रजनन पद्धतींना पर्याय म्हणून काम करतात. ब्रिटनमध्ये स्पर्म बँकिंगची सुविधा आणि प्रवेशक्षमता वाढल्याने मागणीही वाढली आहे. स्पर्म बँकांनी त्यांच्या सेवांचा विस्तार केला आहे आणि आता त्या अधिक सुलभ आणि प्रभावी झाल्या आहेत. यामुळे स्पर्म डोनेशन अधिक सोयीस्कर झाले आहे, ज्यामुळे अधिकाधिक लोक या पर्यायाचा वापर करत आहेत. ब्रिटनमधील कायदेशीर आणि सामाजिक बदलही या मागणीला हातभार लावत आहेत. (हेही वाचा; Male Fertility: पुरूषांचदेखील असतं बाबा बनण्याचे ‘हे’ योग्य वय; 'या' वयानंतर कमी होते स्पर्मची गुणवत्ता, जाणून घ्या प्रजनन क्षमतेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी)
उल्लेखनीय म्हणजे, द गार्डियनच्या वृत्तानुसार, युनायटेड किंगडम पाच वर्षांपूर्वीपर्यंत शुक्राणूंची आयात करणारा देश होता. प्रामुख्याने अमेरिका आणि डेन्मार्कमधून इथे स्पर्म आयात केले जात होते. परंतु 2019 ते 2021 दरम्यान, यूकेने 7,542 स्ट्रॉ स्पर्म्सची निर्यात केली. याव्यतिरिक्त, जगातील सर्वात मोठी शुक्राणू आणि अंडी बँक क्रायोसनेदेखील या एप्रिलमध्ये मँचेस्टरमध्ये एक युनिट उघडले.