UK सरकार कडून दिवसा Burgers, Muffins ते Instant Porridge सह आरोग्याला हानीकारक पदार्थांच्या टीव्ही जाहिरातींवर बंदी; ‘Child Obesity’ वर मात करण्यासाठी नवा फंडा
NHS डेटानुसार, 10 पैकी जवळपास एक मुल लठ्ठ आहे. सुमारे 23.7% पाच वर्षांच्या मुलांमध्ये साखरेच्या अतिसेवनामुळे दात किडण्याचा त्रास आहे.
यूके मध्ये सरकार कडून दिवसा Burgers, Muffins ते Instant Porridge सह आरोग्याला हानीकारक पदार्थांच्या टीव्ही जाहिरातींवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. AFP ने याबाबत वृत्त दिल्याचं समोर आलं आहे. दरम्यान लहान मुलांमध्ये खास आवडीचे असलेल्या granola, muffins यांना जंक फूड म्हणून संबोधलं जातं.सध्या यूके मध्ये लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. ही समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी आता लहान मुलांना जंक फूड पासून दूर करण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. दरम्यान हा निर्णय ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्याचा त्यांचा मानस आहे.
यूके मध्ये National Health Service कडून त्यांच्या अहवालामध्ये लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत असल्याची बाब समोर आल्याचं नमूद केले होते. NHS डेटानुसार, 10 पैकी जवळपास एक मुल लठ्ठ आहे. सुमारे 23.7% पाच वर्षांच्या मुलांमध्ये साखरेच्या अतिसेवनामुळे दात किडण्याचा त्रास आहे.
कोणते पदार्थ सध्या सरकारच्या रडार वर?
दिवसा जाहिरातीवर बंदी घालण्यासाठी आरोग्याला हानीकारक पदार्थांची यादी करण्यात आली आहे. यामध्ये ज्या पदार्थात अतिप्रमाणात साखर, मीठ आणि फॅट आहे त्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाश्ता मध्ये आवर्जुन घेतला जाणारा croissants, पॅनकेक, वॅफल्स, सोबतच granola, muesli, instant porridge सारखे अतिगोड cereals देखील यादीत आहेत.गोड योगर्ट, fizzy drinks, काही फ्रुट ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स, lentil crisps यांचा समावेश आहे. या यादीत Bombay mix देखील आहे. पारंपारिक hamburgers आणि chicken nuggets देखील आरोग्याला हानीकारक असल्याचं म्हटलं आहे.
Natural Porridge Oats आणि गोड न केलेले दही यांसारखे आरोग्यदायी पर्याय निर्बंधांमधून वगळलेले आहेत.या उपाययोजनांद्वारे दरवर्षी childhood obesity ची अंदाजे 20,000 प्रकरणे रोखण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)