महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ UK मध्ये विशेष कॉईन बनवण्याबाबत विचार सुरू

दरम्यान त्यांना हा सन्मान वर्णभेदावरून त्यांनी लढलेल्या लढाईविरूद्ध असेल.

Mahatma Gandhi | Photo Credits : Wikimedia Commons

ब्रिटनमध्ये सध्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची स्मरणार्थ विशेष कॉईन बनवण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. दरम्यान त्यांना हा सन्मान वर्णभेदावरून त्यांनी लढलेल्या लढाईविरूद्ध असेल. सध्या वंशभेद, वर्णभेद यावरून जगभरात एक मोठी लाट निर्माण झाली आहे. अमेरिकेसारख्या देशात काही महिन्यांपूर्वीच वर्णभेदातून कृष्णवर्णीय युवक जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद जगभर बघायला मिळाले.

महात्मा गांधींजीदेखील काही वर्षांपूर्वी वर्णभेदाविरूद्ध आवाज उठवला होता. त्यांच्या माध्यमातून जगभर कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध आवज उठला गेल्याने आता युनयटेड किंग्डममध्ये एका विशेष कॉईनच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली जाण्याची शक्यता आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटीश अर्थमंत्री रिषी सुनक (Rishi Sunak) यांनी रॉयल मिंट अ‍ॅडव्हायझरी कमिटी (RMAC)यांना पत्र लिहून Black, Asian and minority ethnic (BAME)समुदयाला योग्य मान सन्मान देण्याबाबत सूचना केल्या आहेत. RMAC सध्या यावरून महात्मा गांधीजींचा विचार करत आहे. दरम्यान RMAC ही विशेष तज्ञांची स्वतंत्र संस्था आहे. ज्यामध्ये कॉईन बनवणं, डिझाईन याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

दरम्यान महात्मा गांधी यांच्या ब्रिटनला दिलेल्या अंतिम भेटीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त देखील मागील वर्षी युकेमध्ये विशेष कॉईन बनवण्यात आले होते. मागील वर्ष महातमा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्याची घोषणा करण्यात आली होती.

भारतामधून ब्रिटीशांची गुलामगिरी उलथून टाकण्यासाठी महात्मा गांधी यांनी लढा दिला होता. दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळताच अवघ्या काही महिन्यात म्हणजे 30 जानेवारी 1948 दिवशी गांधीजींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.