Two Boys Executed in North Korea: अमेरिका, कोरियन शो पाहणं 2 किशोरवयीन मुलांना पडलं महागात; सार्यांदेखत दिली मृत्यूदंडाची शिक्षा
उत्तर कोरियामध्ये कठोर बंदी असूनही, दक्षिण कोरियाचे शो फ्लॅश ड्राइव्हवर तस्करी केली जातात आणि दंड, तुरुंगवास किंवा मृत्यू टाळण्यासाठी बंद दरवाजाच्या मागे पाहिले जातात.
उत्तर कोरिया (North Korea ) मध्ये 2 शाळकरी मुलांना साऊथ कोरियन (South Korean) आणि अमेरिकन सिनेमे (American movies) पाहिल्याने खुलेआम मारून टाकण्यात आल्याचं वृत्त रिपोर्ट्समध्ये देण्यात आलं आहे. उत्तर कोरिया मध्ये दक्षिण कोरियन सिनेमा पाहणं किंवा शेअर करणं यावर सक्तीची बंदी आहे. नॉर्थ कोरिया मध्ये 16, 17 वर्षीय दोन मुलं Ryanggang Province मध्ये शाळेत भेटली. त्यांनी काही दक्षिण कोरियन आणि अमेरिकन ड्रामा शो पाहिले. असे वृत्तांतून समोर आले आहे.
दरम्यान Mirror च्या वृत्तानुसार, या दोन्ही किशोरवयीन मुलांना शहरात एअरफिल्ड मध्ये सार्यांदेखत ठार मारण्यात आले. हा प्रकार ऑक्टोबर महिन्यातील आहे. पण त्याची माहिती मागील आठवड्यात समोर आली आहे. सरकार कडून या मुलांनी केलेलं कृत्य हे "evil" असल्याने सार्या घाबरलेल्या रहिवाशांना देखील ते पहावं लागलं. नक्की वाचा: Kim Jong-un यांचा नागरिकांना त्यांची नावे बदलण्याचा आदेश; आता North Korea मध्ये मुलांची नावे असतील Bomb, Gun आणि Satellite .
मागील वर्षी नॉर्थ कोरिया मध्ये Kim Jong Un's चे वडील Kim Jong Il यांच्या पुण्यतिथीसाठी 11 दिवसांचा दुखवटा होता. या काळात नागरिकांना हसण्यावर, खरेदीवर, पिण्यावर बंदी होती.
2020 मध्ये, देशात लोकप्रिय होत असलेल्या कोरियन शोवरील क्रॅकडाउनचा भाग म्हणून सरकारने foreign information and influence वर बंदी घातली होती. उत्तर कोरियामध्ये कठोर बंदी असूनही, दक्षिण कोरियाचे शो फ्लॅश ड्राइव्हवर तस्करी केली जातात आणि दंड, तुरुंगवास किंवा मृत्यू टाळण्यासाठी बंद दरवाजाच्या मागे पाहिले जातात.