Twitter Stock Price Manipulation: ट्विटर गुंतवणूकदारांकडून Elon Musk यांच्या विरोधात खटला दाखल, समभागांच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप
एलन मस्क यांनी ट्विटर समभागांमध्ये फेरफार करुन किमती घटविल्या, असा गुंतवणुकदारांचा आरोप आहे. मस्क यांच्यावर गुंतवणूकदारांनी आरोप करत म्हटले आहे की, 44 अब्ज डॉलरची खरेदी बोलीपासून बचाव किंवा डिस्काऊंटबाबत लोकांमध्ये संभ्रम व्हावा यासाठी समभागांच्या किमती घटविण्यात आल्या.
ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलन मस्क (Elon Musk) यांच्या विरोधात ट्विटरच्या गुंतवणूकदारांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. एलन मस्क यांनी ट्विटर समभागांमध्ये फेरफार (Twitter Stock Price Manipulation) करुन किमती घटविल्या, असा गुंतवणुकदारांचा आरोप आहे. मस्क यांच्यावर गुंतवणूकदारांनी आरोप करत म्हटले आहे की, 44 अब्ज डॉलरची खरेदी बोलीपासून बचाव किंवा डिस्काऊंटबाबत लोकांमध्ये संभ्रम व्हावा यासाठी समभागांच्या किमती घटविण्यात आल्या. या खटल्यात टेस्लाचे अब्जाधीश बॉसवरही आरोप आहे की, त्यांनी यासाठी ट्विट केले आणि त्या व्यवहाराबाबत संभ्रम निर्माण होईल अशा प्रतिक्रिया दिल्या. ज्यामुळे सोशल मीडियावर एक प्रकारे काहूर माजले.
एका समभागधारकाने बुधवारी खटला दाखल केला आहे. या खटल्याद्वारे त्याने मस्क यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. सोबतच सॅन फ्रान्सीस्कोच्या न्यायालयात व्यवहाराची वैधता आणि शेअर धारकांचे नुकसान याबाबत भरपाई मिळावी अशीही मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. मस्क यांनी या आधीच्या आठवड्यात म्हटले होते की, ट्विटरला खरेदी करण्यासाठी त्यांची बोली तोपर्यंत पुढे सरकली नाही जोपर्यंत त्यांना प्लॅटफॉर्मवर असलेल्या स्पॅम अकाऊंट्सची संख्येचा पूरावा मिळाला नव्हता. ज्यामुळे अनिश्चितता वाढली होती. (हेही वाचा, Sexual Harassment: टेस्लाचे सीईओ Elon Musk यांनी फेटाळले लैंगिक छळाचे आरोप; जाणून घ्या काय आहे प्रकरण)
मस्क यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, खरेदीचा व्यवहार अनिश्चित काळासाठी होल्डवर आहे. खटल्यात शक्यता वर्तविण्यात आली आहे की, ही खरेदी असे काही करण्यास अनुमती देत नाही. वर्जीनिया येथील हेरेन्सियाक यांच्यादावारा दाखल खटल्यात म्हटले आहे की, एप्रीलच्या शेवटी अशा प्रकारच्या मोठ्या व्यवहारात अपेक्षेनुरुप कष्ट न घेता ट्विटर खरेदीबाबत चर्चा केली गेली. मस्क यांना चांगलेच ठाऊ कोते की काही ट्विटर अकाऊंट्स ही प्रत्यक्ष लोकांपेक्षा सॉफ्टवेअर 'बॉट्स' द्वारा नियंत्रित केली जात होती आणि कंपनीला खरेदीसाठी सादरीकरण करण्यापूर्वी याबाबत ट्विट होते.