US President Donald Trump यांच्या ब्लॅक समर्थकांचे फेक अकाऊंट्स ट्विटरकडून बॅन

तसंच त्यांच्या द्वारा चालवण्यात येणाऱ्या कॅम्पेन अकाऊंटवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

Twitter (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या ब्लॅक समर्थकांचे (Black Supporters) फेक अकाऊंट्स (Fake Accounts) ट्विटरकडून (Twitter) बॅन करण्यात आले आहेत. तसंच त्यांच्या द्वारा चालवण्यात येणाऱ्या कॅम्पेन अकाऊंटवर देखील बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. वॉशिंगट पोस्टने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकराचे दोन डझन अकाऊंट्स सक्रीय असल्याचे क्लेमसन युनिव्हर्सिटीचे सोशल मीडिया रिसर्चर डेरने लिनविन यांच्या निर्दशनास आले. यापैकी अनेकजण आपल्या ट्विटमध्ये एकाच प्रकारच्या भाषेचा उपयोग करत असल्याचे दिसून आले होते.

रिपोर्टनुसार, काही अकाऊंट्सला खूप फॉलोअर्स आहेत. मात्र आता सर्व अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आले आहेत. दोन डझनहून अधिक फेक अकाऊंट्समधून तब्बल 265,000 रिट्विट करण्यात आले होते. तसंच यातील बहुतांश अकाऊंटमध्ये प्रोफाईल पिक्चरला ब्लॅक माणसाचा फोटो लावण्यात आला होता. विशेष म्हणजे हा फोटो न्यूज रिपोर्ट किंवा इतर सुत्रांकडून घेण्यात आला होता.

ट्विटरचे प्रवक्ता ट्रेनटन कॅनेडी यांनी सांगितले की, "आमची टीम अशा प्रकराच्या अॅटीव्हीटीजवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन असते. ट्विट्सच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्लक समर्थकांचे फेक अकाऊंट्स गेल्या दोन महिन्यांपासून अधिकच अॅक्टीव्ह झाले होते." (Journalist Shirish Date: भारतीय वंशाचे पत्रकार शिरीष दाते यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला विचारला 'हा' प्रश्न; राष्ट्राध्यक्ष म्हणाले 'पुढचा प्रश्न')

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रचारासाठी फेक अकाऊंटला उधाण आल्याचे बोलले जात आहे. (US Election 2020: डोनाल्ड ट्रंम्प आणि जो बिडेन यांच्यामध्ये येत्या 15 ऑक्टोंबरला होणारी Presidential Debate रद्द)

दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचे आव्हान आहे. यांच्यात पहिली Presidential Debate पार पडली असून 15 ऑक्टोबर रोजी होणारी डिबेट रद्द करण्यात आली आहे.