तुर्की: इस्तंबुल विमानतळावर एका विमानाला अपघात; एकाचा मृत्यू तर, 150 हून अधिक प्रवासी जखमी

या अपघात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर, 150 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.

तुर्कीच्या इस्तंबुल येथील विमानतळावर एक प्रवासी विमान घसरून त्याचे तिन तुकडे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर, 150 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आले असून अन्य विमानांना दुसरीकडे वळवण्यात आले आहे. विमानात एकूण 20 जण परदेशी तर, उर्वरित तुर्की नागरिक होते. तसेच खराब हवामानामुळे विमानाला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

इस्तंबुल शहरातील विमानतळावर घडलेल्या या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या विमानात 6 क्रू सदस्यांसह 177 प्रवाशी प्रवास करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर विमान घरसल्यानंतर मागच्या बाजूला आगही लागली होती. त्यानंतर अग्निशमनदलाने ही आग आटोक्यात आणली. हे देखील वाचा- दीडदमडीचे सँडविच चोरले, तब्बल 9 कोटी रुपये पगाराची नोकरी गमावली; सीटी ग्रुपकडून भारतीय बँकरचं निलंबन

ट्विट-

जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये दक्षिण कोरियाचा एक नागरिक असून सर्व जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच हा अपघात घडण्यामागचे नेमेक कारण काय? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, खराब वातावरणामुळे विमानाचे लॅंडिंग करत असताना ही घटना घडली, अशी माहिती समोर आली आहे.