Indonesia मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्सुनामी, 62 जणांचा मृत्यू तर 600 हुन अधिक जखमी
शनिवार रात्री पासून उसळणाऱ्या लाटांमुळे सुमारे 43 जणांचा मृत्यू झाला असून 600 हुन अधिक लोक बेपत्ता आहेत. यामध्ये काही जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Indonesia tsunami: इंडोनेशियामध्ये (Indonesia) ज्वालामुखीचा (volcano ) उद्रेक झाल्यानंतर आता त्सुनामीने (Tsunami ) रौद्र रूप धारण केलं आहे. शनिवार रात्री पासून उसळणाऱ्या लाटांमुळे सुमारे 43 जणांचा मृत्यू झाला असून 600 हुन अधिक लोक बेपत्ता आहेत. यामध्ये काही जण बेपत्ता असल्याची माहिती रविवार ( २३ डिसेंबर ) सकाळी देण्यात आली होती. सध्या इंडोनेशियामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून बचावकार्य सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या माहितीनुसार आता मृतांचा आकडा वाढून तो 62 पर्यंत पोहचला आहे.
इंडोनेशियामध्ये दक्षिणी सुमात्रा किनाऱ्यावर त्सुनामीच्या लाटांमुळे हजारो इमारती कोसळल्या आहेत.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी स्थानिकांसाठी मदतकार्य आणि बचावकार्य सुरु केले आहे.
26 डिसेंबर 2004 साली देखील अशाच प्रकारे इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे हाहाकार पसरला होता. त्यामध्ये सुमारे 120,000 इंडोनेशियन नागरिक आणि 13 देशातील इतर 226,000 नागरिकांचा मृत्यू झाला होता.