'हाउडी मोदी' कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश; पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्रपती भारतीय समुदायाला संबोधित करणार
भारतीय (Indian) समुदायाच्या कार्यक्रमात अमेरिकन राष्ट्रपतींचा सहभाग असण्याची ही पहिली वेळ असेल. '
अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रविवारी हे स्पष्ट केले की, ते 22 सप्टेंबर रोजी ह्यूस्टनमध्ये (Houston) हाउडी मोदी (Howdy Modi) कार्यक्रमास उपस्थित राहतील. भारतीय (Indian) समुदायाच्या कार्यक्रमात अमेरिकन राष्ट्रपतींचा सहभाग असण्याची ही पहिली वेळ असेल. 'हाउडी मोदी' कार्यक्रमात जाण्याअगोदर नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिकन कंपन्यांच्या सीईओंसमवेत बैठक घेणार आहेत. आतापर्यंत 50 हजाराहून अधिक लोकांनी 'हाउडी मोदी' कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. हाउडी या शब्दाचा अर्थ आपण कसे आहात? असा होतो.
मोदी 21 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यानंतर मोदी सर्वप्रथम ह्यूस्टनमध्ये दाखल होतील. पंतप्रधान मोदी 23 ते 27 सप्टेंबर दरम्यान यूएन (UN) महासभेत भाग घेणार आहेत. सुरेक्षेसाठी दोन्ही देशांमधील अधिकारी मोदी आणि ट्रम्प यांच्यात वॉशिंग्टनमध्ये (Washington) बैठक घेण्याचा विचार करीत आहेत. मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची, शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदीं यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील (New York) मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये एनआरआय समुदायाला संबोधित केले होते. यावेळी मोदींच्या या कार्यक्रमात अमेरिकेतील अनेक लोकांनी सहभाग घेतला होता. हे देखील वाचा- UK Work Visa आता दोन वर्षांसाठी; भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थांना मोठा दिलासा
मोदी अमेरिकेत एवढ्या मोठ्या संख्यने भारतीय समुदायाला संबोधित करण्याची ही तिसरी वेळ आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तसेच दुसऱ्यांदा प्रंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा अमेरिकेचा पहिला दौरा आहे. आतापर्यंत मोदींचे अमेरिकेत 2 कार्यक्रम पार पडली आहेत. त्यापैकी एक 2014 मध्ये नूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झाला होता, तर दुसरा कार्यक्रम 2016 मध्ये सिलिकॉन व्हॅली येथे आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमात 20 हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.