Karol Nawrocki Wins Poland Presidential Election: पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प समर्थित कंझर्व्हेटिव्ह नेते कॅरोल नॉवरॉकी विजयी

अंतिम मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, नॉवरोकी यांना 50.89 टक्के मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी वॉर्साचे महापौर राफल ट्राझास्कोव्स्की यांना 49.11 टक्के मते मिळाली.

Karol Nawrocki Wins Poland Presidential Election: पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प समर्थित कंझर्व्हेटिव्ह नेते कॅरोल नॉवरॉकी विजयी
Karol Nawrocki (Photo Credit - Facebook)

Karol Nawrocki Wins Poland Presidential Election: कंझर्व्हेटिव्ह नेते कॅरोल नॉवरोकी (Conservative Karol Nawrocki) यांनी पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकीत (Poland Presidential Election 2025) अत्यंत निकराच्या लढतीत विजय मिळवला आहे. अंतिम मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, नॉवरोकी यांना 50.89 टक्के मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी वॉर्साचे महापौर राफल ट्राझास्कोव्स्की यांना 49.11 टक्के मते मिळाली. रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या एका सुरुवातीच्या एक्झिट पोलमध्ये ट्राझास्कोव्स्की विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून आले, परंतु काही तासांनंतर अपडेटेड मतदानाने चित्र उलटे करण्यास सुरुवात केली. निकालावरून असे दिसून येते की, पोलंड त्याच्या नवीन नेत्याच्या नेतृत्वाखाली अधिक प्रगतीकडे वाटचाल करेल. कंझर्व्हेटिव्ह नेते कॅरोल नॉवरोकी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता.

पोलंडमधील राष्ट्रपतीची भूमिका -

पोलिश राजकीय व्यवस्थेतील बहुतेक दैनंदिन सत्ता संसदेने निवडलेल्या पंतप्रधानावर अवलंबून असते. तथापि, राष्ट्रपतींची भूमिका केवळ औपचारिक नसते. परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडण्याचा आणि कायद्यावर व्हेटो करण्याचा अधिकार या पदाकडे आहे. नॉरोकी हे आंद्रेज दुडा यांची जागा घेतील. (हेही वाचा - Israel-Hamas War: इस्रायलचा-गाझा पट्टीत पुन्हा हल्ला; 21 पॅलेस्टिनी ठार)

रशिया-युक्रेन युद्धावर नॉवरॉकीच्या विजयाचा परिणाम -

दरम्यान, युक्रेनियन सैन्याने 5 रशियन हवाई तळांवर केलेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध सध्या 3 वर्षातील सर्वात घातक टप्प्यात आहे. रशिया युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर देऊ शकतो. अशा परिस्थितीत, पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकीत रूढीवादी उमेदवार कॅरोल नॉवरॉकीच्या संभाव्य विजयाचा रशिया-युक्रेन युद्धावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. नॉवरॉकी हे उजव्या विचारसरणीच्या पक्ष 'लॉ अँड जस्टिस' च्या जवळचे मानले जातात. त्यांच्या निवडणूक प्रचारात त्यांनी पोलंडच्या युक्रेनबद्दलच्या धोरणाबद्दल अनेक निर्णायक संकेत दिले आहेत.

नॉवरॉकी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत पोलंडसाठी ऐतिहासिकदृष्ट्या संवेदनशील मुद्दे जसे की व्होल्हिनिया हत्याकांड सोडवले जात नाही तोपर्यंत ते नाटो किंवा युरोपियन युनियनमध्ये युक्रेनच्या समावेशाच्या बाजूने नसेल. आतापर्यंत पोलंडने युक्रेनला पुरेशी मदत केली आहे, परंतु पुढील संबंध केवळ सहकार्यावर नव्हे तर 'स्पर्धा' आणि 'राष्ट्रीय हितसंबंधांवर' आधारित असतील. नॉवरोकी हे युक्रेनमध्ये पोलिश सैन्य तैनात करण्याच्या विरोधात आहेत. यावरून स्पष्ट होते की, नॉवरोकी अध्यक्ष झाल्यानंतर पोलंडचा युक्रेनला लष्करी पाठिंबा आणि सहकार्य कमी होऊ शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2025 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).