Cigarette Ban: 'या' देशात तरुणांना मिळणार नाही सिगरेट, मंजूर झाला कायदा

तंबाकूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या (Tobacco Smoking) व्यसनापासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी न्यूझीलंडमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार तरुणांना आता सिगारेट खरेदी करण्यावर आजन्म बंदी असणार आहे.

Cigarettes | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

Cigarette Ban For Youth In New Zealand: न्यूझीलंड (New Zealand ) सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तंबाकूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या (Tobacco Smoking) व्यसनापासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी न्यूझीलंडमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार तरुणांना आता सिगारेट खरेदी करण्यावर आजन्म बंदी (Lifetime Ban on Young People Buying Cigarettes) असणार आहे. तंबाकुजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार, न्यूझीलंडमध्ये 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखूची विक्री करता येणार नाही, असे कायदा सांगतो.

सरकाच्या नव्या निर्णयानुसार न्यूझीलंडमधील सिगारेट खरेदीदाचे किमान वय वाढतच जाईल. ज्यामुळे सीगारेट खरेदी विक्रीवर आपोआपच मर्यादा येऊ लागतील. उल्लेखनिय असे की, न्यूझीलंडमध्ये आजपासून आजपासून 50 वर्षांनंतर सिगारेटचे पॅकेट विकत घेण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला ते किमान 63 वर्षांचे असल्याचे दाखवून द्यावे लागेल. त्यासाठी त्याला तसे ओळखपत्र दाखवावे लागेल. (हेही वाचा, E- Cigarettes: गांजा, ई-सिगारेट, तंबाखू, सिगारेटमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, इतर गंभीर आजार होण्याचीही शक्यता- अभ्यास)

सन 2025 पर्यंत न्यूझीलंड धूम्रपानमुक्त करण्याचा सरकारचे उद्दीष्ट आहे. या उद्दीष्टाच्या दिशेने सरकारने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif