Tick Bite: स्पेनमध्ये, इबोला सारख्या विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, इबोला आजाराचा मृत्यू दर 40 टक्क्यांपर्यंत आहे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही लस नाही. 'मेट्रो' या न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, क्रिमियन-काँगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF) ग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा शनिवारी माद्रिदजवळील रुग्णालयात मृत्यू झाला. हा विषाणूमुळे होणारा आजार आहे, ज्याला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 'प्राधान्य रोग' म्हणून वर्गीकृत केले आहे. स्पेनच्या राजधानीच्या नैऋत्येस सुमारे 100 मैल अंतरावर असलेल्या टोलेडो येथे किटक चावल्यानंतर पीडितेला 19 जुलै रोजी मोस्टोल्स प्रदेशातील रे जुआन कार्लोस विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे देखील वाचा: Indian Startup Job Data: भारतातील 1.4 लाखाहून अधिक स्टार्टअप्सनी केल्या 15.5 लाख नोकऱ्या निर्माण
डॉक्टरांच्या चाचण्यांनंतर रुग्णाला दुर्मिळ विषाणूची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर, त्याला माद्रिदमधील ला पाझ विद्यापीठ रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याला वेगळ्या वॉर्डात ठेवण्यात आले होते.
रुग्णाची प्रकृती सुरुवातीला स्थिर असल्याचे सांगण्यात आले, परंतु क्रिमियन-काँगो हेमोरेजिक ताप (CCHF) ची सर्व लक्षणे विकसित झाल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. यामुळे गेल्या शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. इबोला सारखाच हा रोग, जागतिक आरोग्य संघटनेने साथीच्या रोगास कारणीभूत असणा-या नऊ रोगजनकांपैकी एक म्हणून ओळखले आहे.