Cancer असल्याचे खोटे सांगून महिलेले जमवले तब्बल 45 हजार पाउंड; हॉटेलिंग, विमान प्रवास व जुगारावर उडवला पैसा
या महिलेने आपल्याला कर्करोग (Cancer) झाला असल्याचा दावा करत ऑनलाइन निधीची विनंती केली होती. लोकांनाही तिची दया येऊन त्यांनी तिला भरघोस मदत केली
युकेच्या (UK) एका महिलेवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेने आपल्याला कर्करोग (Cancer) झाला असल्याचा दावा करत ऑनलाइन निधीची विनंती केली होती. लोकांनाही तिची दया येऊन त्यांनी तिला भरघोस मदत केली आणि जेव्हा तिला हा निधी मिळाला तेव्हा, तिने तो चैनीच्या गोष्टींवर उधळला. महत्वाचे म्हणजे यामध्ये जुगार (Heavy Gambling) देखील समाविष्ट आहे. या महिलेने आपल्याला कर्करोग झाला असल्याचे सांगून तब्बल £45,000 म्हणजेच 44,25,504 रुपये गोळा केले होते. सध्या या प्रकरणाबाबत कोर्टात सुनावणी चालू आहे.
42 वर्षीय निकोलवर (Nicole Elkabbass) असा आरोप आहे की, तिने GoFundMe पेजवर स्वत:ला कर्करोगग्रस्त स्त्री असल्याचे सांगितले व लोकांकडून पैसे उकळले. या पेजवर निकोलचा एक फोटो दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच अशक्त दिसत आहे. रुग्णालयाच्या बेडवर ब्लँकेट घेऊन ती पडली आहे. मात्र हा फोटो ती कर्करोगग्रस्त असण्याशी संबंधित नाही, तर जेव्हा तिने पित्त मूत्राशय काढून टाकले तेव्हाचा हा फोटो आहे. अशा प्रकारे लोकांशी खोटे बोलून निकोलने 45 हजार पौंडचा निधी उभा केला.
कोर्टासमोर या प्रकरणात फिर्यादी बेन इरविन यांनी सांगितले की, निकोलने आपली लाईफस्टाईल टिकवून ठेवण्यासाठी हे सर्व खोटे सांगितले होते. तिने मिळालेला पैसा आपल्या कर्करोगाच्या उपचारासाठी वापरला नाही, तर या पैशांसह तिने चैन केली. यामध्ये प्रवास, ऑनलाइन जुगार, रेस्टॉरंटची बिले आणि प्रीमियर लीग फुटबॉल सामने पाहण्यासाठी हवाई तिकिटे यांचा समावेश आहे. याबाबतचा पुरावा सादर करता, निकोलचा जुना मित्र निकोलस हमफ्रे मॉरिस, जो सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ आहे, त्याने निकोलला कर्करोग असल्याचे निदान केल्याचा दावा नाकारला. (हेही वाचा: Not a Match! 78 वर्षीय व्यक्तीचे 17 वर्षीय मुलीसोबत लग्न; अवघ्या 22 दिवसांत घटस्फोट)
निकोलने जो रुग्णालयातील फोटो पोस्ट केला होता तो कर्करोगाशी संबंधित नसून, तिच्या जुन्या शस्त्रक्रियेचा असल्याचेही निकोलसने सांगितले. निकोलला जवळजवळ 39 लोकांनी पैशांची मदत केली होती.